कसा जाईल तुमचा आजचा दिवस? मेष ते मीन राशीपर्यंतचे राशी भविष्य जाणून घ्या

0
13

मेष- आज आपला आत्मविश्वास अत्यंत मजबूत असेल. सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत लाभ संभवतो. आज आनंदाची बातमी प्राप्त होईल.मान सन्मान वाढेल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ आहे. राजनीती, मीडिया, व्यापारी वर्गासाठी दिवस अत्यंत शुभ आहे. प्रेमीं प्रेमीकांसाठी ही दिवस अत्यंत शुभ आहे. शुभ अंक 2, शुभ रंग पिवळा.

वृषभ- आज आपण स्वतःला इतरांच्या तुलनेत वरचढ सिद्ध करण्यासाठी प्रयत्न कराल ज्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक नाराज होऊ शकतात. आरोग्याची काजळी घ्या. वादविवादा पासून दूर राहा. अचानक धनलाभ होऊ शकतो. पार्टनरशिप पासून लाभ संभवतो.
शुभ अंक 2, शुभ रंग आकाशी.

मिथुन- आज मन भरकटलेल्या अवस्थेत असेल. संवेदनशीलता जास्त जाणवेल. प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया देणे टाळा,संयम ठेवा. प्रतियोगी परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांना दिवस शुभ आहे. जोडीदारा सोबत दोन दोन शब्द होऊ शकता तेव्हा शब्दांची निवड विचारपूर्वक करा. व्यापारी वर्गाने देवाण-घेवाण करतांना सावधानीपूर्वक करावी वादविवाद टाळावे.
शुभ अंक 3 शुभ रंग पांढरा.

कर्क- आज गुंतवणूक करणे सहसा टाळावे किंवा विचारपूर्वक करावी, जुने मित्र मैत्रिणी ची भेट होऊ शकते जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आपल्या प्रतिष्ठेला प्रतिकूल ठरेल असे कुठलेही कार्य करू नये. कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी ते व्यवस्थित वाचून समजून करा. व्यापारी वर्गास आज फायदा होईल. आज वादविवाद करणे क्रोध करणे टाळावे. जोडीदाराचे प्रेम, सहयोग प्राप्त होईल. प्रेमीं, प्रेमिकांना प्रपोज करण्यासाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक 1 शुभ रंग पांढरा.

सिंह- ठरवलेले कार्य आज पूर्ण होऊ शकते. जबाबदारी स्वीकारा. गुंतवणूक करण्यासाठी दिवस चांगला आहे. लोकांचा सहयोग मिळेल. मागच्या काही दिवसांपासून कुठलीही अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आज त्या संदर्भात सकारात्मक बातमी मिळेल. व्यापारी वर्ग कुठल्या नवीन गोष्टी करण्याच्या विचारात असाल तर दिवस शुभ आहे, विचारपूर्वक गुंतवणूक करावी. प्रेमीं प्रेमीकांसाठी दिवस अत्यंत शुभ आहे.
आरोग्याच्या दृष्टीने ऋतुमानानुसार होणारे आजार होऊ शकतात काळजी घ्यावी.
शुभ अंक 3, शुभ रंग हिरवा.

कन्या- उत्पन्नात वाढ होईल. कार्यक्षेत्रात लाभ होईल.दिवस चांगला असून पण आज मन विचलित असेल. यशस्वी होण्यासाठी स्वभावात विनम्रता ठेवावी लागेल. सहकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध ठेवा. गरजेच्या वेळी मदत मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांना दिवस उत्तम आहे. कामे पूर्ण होतील. राग करू नका. पोटाचे विकार उद्भवू शकतात. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
शुभ अंक 2, शुभ रंग मरून.

तुला- आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. मनातील कल्पना प्रत्येकाला सांगत बसू नका त्याने नुकसान होऊ शकते. आपल्या घरच्यांना प्रेमाची कबुली आज देऊ शकता. विचारपूर्वक कार्य केल्यास यश हमखास मिळेल. आजच्या दिवसाची शुभता तुम्हाला जाणवेल. दिखावा करणे टाळा. गैरसमज दूर होतील. अर्धशिशी सारखे दुखणे होऊ शकते.
शुभ अंक 4, शुभ रंग गुलाबी.

वृश्चिक- आजचा दिवस शुभ आहे ठरवलेली कामे पूर्ण होतांना दिसत आहे, करियरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर करू शकता.
वाणीवर नियंत्रण ठेवा. अचल संपत्ती खरेदी करण्याचा विचार असेल तर करू शकता. धनलाभ होईल. मद्यपान मांसाहार टाळावा. प्रेमी प्रेमीकांसाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक 8, शुभ पिवळा.

धनु- आरोग्य थोडे बिघडू शकते. मन अशांत असेल. उच्चाधिकाऱ्यां पासून लाभ संभवतो. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला असेल. गुंतवणूक करणे टाळावे. भावंडांकडून सहयोग प्राप्त होईल. घाईघाईने कार्य करणे टाळावे. प्रेमी प्रेमिकांमध्ये मतभेद होऊ शकता.
शुभ अंक 1, शुभ रंग फिक्कट लाल.

मकर- दिवस अत्यंत शुभ आहे. जे ही हवे होते असे मिळताना दिसेल. इच्छा, महत्वकांक्षा पूर्ण होतील. आज केलेला प्रवास, यात्रा शुभ ठरतील.धनलाभ होईल. आज काहीही करत असताना एकाग्रतेने करावे अतिउत्साही होऊन करू नये. जुने दुखणे उद्भवू शकते.
शुभ अंक 1, शुभ रंग पिवळा.

कुंभ- आज आपली ऊर्जा आणि आत्मविश्वास शिखरावर असेल. कार्यात यशप्राप्ती होईल. दिवस आनंदात जाईल. सर्व बाजूने सहयोग लाभेल. महत्वपूर्ण कामे मार्गी लागतील. आई वडिलांकडुन मदत प्राप्त होईल. व्यापारी वर्गास सफलता प्राप्त होईल. प्रेमीं युगलांसाठी दिवस चांगला आहे आज प्रपोज करू शकता.
शुभ अंक2, शुभ रंग पिवळा.

मीन- आज कार्यक्षेत्रात अडचणी उद्भवू शकतात. वडिलांच्या आरोग्याची काळजी वाढेल. जबाबदारी स्वीकार करावी लागेल तीच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी पूर्णपणे निरखून, समजून मगच करावी. आज कुणालाही उसने पैसे देने टाळावे व घेणे ही टाळावे. जोडीदारा सोबत फिरायला जाऊ शकता. प्रेमीं युगलांसाठी दिवस चांगला आहे.
शुभ अंक 1, शुभ रंग क्रीम.

ज्योतिषशास्त्री
शाशीसुत


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here