Horoscope 4 February | आजकालच्या जीवनशैलीतील अनेक गोष्टी या तुमच्या मनाविरुद्ध होत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार, या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी आपल्या ग्रहांच्या प्रभावामुळे घडत असतात. राशिभविष्य हे ग्रहांच्या हालचाली लक्षात घेऊन पंचांगाच्या आधारे केलेले भाकीत होय. तर जाणून घेऊयात की, आजचा ४ फेब्रुवारी रविवारचा दिवस हा सर्व १२ राशीच्या लोकांसाठी कसा जाईल. वाचा आजचे राशीभविष्य…
मेष राशी –
आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा सांभाळावी. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. आज तुम्ही तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण करू होतील. ज्यामुळे तुमची व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तरुणांनी आज जर तुमचा एखादा मित्र तुमच्याकडे आर्थिक मदत मागायला आला तर, त्याला मदत करा. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.(Horoscope 4 February)
वृषभ राशी –
नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चांगले संपर्क ठेवावेत. अन्यथा तुमचे काही मोठे वाद होऊ शकतात आणि याचा परिणाम तुमच्या नोकरीवरही होऊ शकतो. व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळू शकतो. तरुणांनी आज कुठलेही काम करताना आपल्या आई-वडिलांचा सल्ला घ्यावा. आज पैसे खर्च करताना जरा जपून करा. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, आज उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जरा जास्त काळजी घ्यावी. तसेच आज तुम्ही मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.(Horoscope 4 February)
मिथुन राशी –
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. नोकरदार वर्गाच्या लोकांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जुळवून घ्यावे आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करावेत. व्यावसायिकांना आज त्यांच्या विरोधकांना सामोरे जावे लागेल. मात्र, प्रत्येक बाब संयमाने हाताळावी. तरुणांनी तुमच्या अभ्यासावर आणखी लक्ष द्यावे. तरच, तुम्हाला तुमच्या शैक्षणिक आयुष्यात यश मिळेल. आज तुम्ही तुमच्या मुलांसोबत चर्चा करा. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा आणि त्यांच्या मनात काय चाललंय ते जाणून घ्या. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुमचे आरोग्य चांगले राहील. मात्र, तुम्ही योगा किंवा व्यायाम केल्यास ते अजून सुदृढ राहील.
Horoscope 3 February | ‘या’ लोकांनी नात्यात प्रामाणिक राहावे; वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope 4 February | कर्क राशी –
नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज तुमच्या समजूतदारपणाने सर्व गोष्टी सांभाळाव्यात. कारण आज तुमचे वरिष्ठ तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी सोपवू शकतात. व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायात स्वतः लक्ष केंद्रित करायला हवे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना अजून मेहनत करण्याची गरज आहे. जे लोक कामानिमित्त बाहेरगावी असतात. ते आज त्यांच्या कुटुंबाकडे येण्याचे नियोजन करू शकतात. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज तुम्ही नियमित तपासणी करून घ्यावी.(Horoscope 4 February)
सिंह राशी –
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. नोकरदार वर्गाच्या लोकांच्या ऑफिसमध्ये जर आज काही मीटिंग असेल तर, त्या मीटिंगमध्ये तुमचे प्रेझेंटेशन चांगले असेल याची काळजी घ्या. व्यावसायिकांना जर भागीदारीत एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर जरा सांभाळून निर्णय घ्या. तरुणांनी स्वत:ला सर्वगुणसंपन्न बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आजचा दिवस हा शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठीही खूप चांगला आहे. आज तुमचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुम्हाला जर हृदयाशी संबंधित कोणतीही समस्या असेल तुम्ही तळलेले किंवा बाहेरचे अन्न खाणे टाळावे.
कन्या राशी –
नोकरदार वर्गाच्या लोकांनी विशेषतः मीडियात काम करणाऱ्या लोकांना आज काही मोठ्या संधी मिळू शकतात. आज व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल. मात्र, मेहनत करणे हे कायम ठेवा. तरुणांनी आज वायफळ खर्च टाळावा. अन्यथा पुढे तुम्हाला काही आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, शरीर निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करा. जर तुम्हाला मानसिक त्रास असतील तर, स्वतःला काही कामात व्यस्त ठेवा आणि तुमच्या मनाला शांती मिळेल. अशा गोष्टींना प्राधान्य द्या. (Horoscope 4 February)
तूळ राशी –
आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. नोकरदार वर्गाच्या लोकांची आज त्यांच्या कामामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकते. व्यवसायिकांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रसन्न वाटेल असे वातावरण ठेवावे. त्यांना मदत असल्यास मदत करावी. ज्या तरुणांना वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे भविष्य घडवायचे आहे. त्यांना यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुमच्या आक्रमक स्वभावामुळे तुम्हाला अपमानाला सामोरे जावे लागू शकते. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, जे रुग्णालयात दाखल असतील त्यांना आज आराम मिळू शकतो.
Horoscope 27 January | ‘या’ लोकांनी आरोग्याची तपासणी करावी; वाचा आजचे राशिभविष्य
वृश्चिक राशी –
नोकरदार वर्गाच्या लोकांची आज तुमच्या ऑफिसमध्ये काम करताना थोडी चिडचिड होईल. यासाठी तुम्ही थोडी विश्रांती घेऊन आराम करावे. व्यवसायिकांनी आर्थिक स्थिती लक्षात घेऊन आणि योग्य नियोजन करूनच काम करावे. जेणेकरून त्यांना पुढे येणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळता येईल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आंदचे क्षण घालवू शकतात. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, तुमच्या घरात एखादे लहान मूल असेल तर त्याची विशेष काळजी घ्या.(Horoscope 4 February)
धनु राशी –
धनू राशीच्या लोकांनी आज थोडे सावध राहावे. नोकरदार वर्गाच्या लोकांनी तुमच्या सहकाऱ्यांना समजून घेतले पाहिजे. व्यवसायिकांनी आज कुठलेही व्यवहार करताना सावध असावे. आज तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तरुणांचे नशिब बदलू शकते. यामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग हा मोकळा होईल. तुमच्या जोडीदाराच्या व मुलांच्या भावनांना महत्त्व द्या. त्यांच्यासाठी वेळ काढा. तसेच त्यांना बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.
मकर राशी –
नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज एखादी मोठी जबाबदारी आल्यास घाबरून जाऊ नये. व्यवसायिकांना आज व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. तुमच्या हातून आज पुण्याची कामं होतील. गरिबांना मिठाईचे वाटप करणे तुमच्यासाठी चांगले ठरू शकते. विद्यार्थी आणि तरुणांनी आज लुतहलेही मोठे निर्णय घेऊ नये त्यात तुम्हाला कामात अपयश येऊ शकते. मात्र, यातून तुम्हाला मोठा धडा मिळेल हे अपयश तुम्ही कायम लक्षात ठेवाल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, महिलांना काही हार्मोनल समस्या जाणवू शकतात. त्यामुळे तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. (Horoscope 4 February)
कुंभ राशी –
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. नोकरदार वर्गाच्या लोकांनी आज तुमच्या ऑफिसमधील ईर्ष्यावान सहकाऱ्यांपासून थोडे सावध राहावे. ते आज तुमचे काही नुकसान करण्यासाठी कट रचू शकतात. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी उत्तम लाभाचा दिवस असेल. मात्र, आज मिळलेल्या नफ्यातून अतिरिक्त खर्च करू नका तर, तुमचे काही जुने देणे फेडण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमची जुन्या मित्रांसोबत भेट होईल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला हंगामी आजारांच्या काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. (Horoscope 4 February)
मीन राशी –
नोकरदार वर्गाच्या लोकांची आज ऑफिसमध्ये महत्त्वाची बैठक होऊ शकते. या मीटिंग दरम्यान तुमचा बॉस आज तुमच्यावर खूश असेल. व्यावसायिकांना आज काही व्यासायिक समस्या भासू शकतात. तरुणांनी आज शैक्षणिक बाबींमध्ये कुठलीही चूक होणार याची काळजी घ्यावी. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही आज तुमच्या पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुम्हीही तुमच्या खाण्याच्या सवयी पाळा. आज तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. (Horoscope 4 February)
(टीप – वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ हे केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही किंवा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम