Hiraman Khoskar | इगतपुरीचे आमदार अजित पवार गटात..?; भुजबळांच्या भेटीने चर्चांना उधाण

0
27
Hiraman Khoskar
Hiraman Khoskar

नाशिक :  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर हे नॉट रीचेबल होते. त्यामुळे त्यांच्याही भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यावेळी त्यांनी या चर्चांना विराम लावला होता. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत स्वतः अजित पवार (Ajit Pawar) इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) हे आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यामुळे नाशिकच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, यानंतर आज हिरामण खोसकर हे आज राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी भुजबळ फार्म (Bhujbal Farm) येथे पोहोचले आहे. सुरुवातीपासूनच खोसकर हे भुजबळांच्या जवळचे मानले जात होते. त्यामुळे ते आता अजित पवार गटात (Ajit Pawar Group) प्रवेश करणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर हे महायुतीत सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तर, दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातील भाषणात अजित पवारांनी थेट खोसकरांचे नाव घेत ते आपल्या संपर्कात असल्याचा दावाही केला होता. यानंतर आज हिरामण खोसकर आणि छगन भुजबळ यांची भेट झाली असून, या भेटीत काय चर्चा झाली..? आणि खोसकर अजित पवार गटात प्रवेश करणार का..? हे पहावे लागणार आहे.

Congress | इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकरांचाही काँग्रेसला रामराम..?

Hiraman Khoskar | काय म्हणाले हिरामण खोसकर..?

दरम्यान, तुम्ही महायुतीतील प्रवेशाबाबत हिरामण खोसकर यांना विचारणा केली असता “२० पैकी १९ जण तर महायुतीतच आहेत. पण मी एकटाच आता महाविकास आघाडीत आहे, अशी मिश्किल टिप्पणी केली. तर, भुजबळांच्या भेटीबाबत “छगन भुजबळ हे मंत्री असल्याने त्यांनी भेट घेतली असल्याचे हिरामण खोसकर म्हणाले.

राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये काँग्रेस आमदाराचा उल्लेख 

राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली असून, या पूर्ण निवडणुकीदरम्यान नाशिकचे राजकारण चर्चेत राहिले. नाशिकच्या जागेसाठी अजित पवार गटही इच्छुक होता. मंत्री छगन भुजबळ यांचे नाव जवळपास फायनल झालेले असल्याची चर्चा असताना त्यांनी अचानक जाहीर माघार घेतली.

दरम्यान, याबाबत राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले की,”नाशिक लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला हवी होती. तसे नियोजनही करण्यात आले होते. या लोकसभा मतदार संघात आपले आमदार माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे यांचे नाव घेताना अजित पवारांनी हिरामण खोसकर यांच्याही नावाचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार केला. यामुळे आता हिरामण खोसकर यांच्या अजित पवार गटातील पक्ष प्रवेशाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.

Nashik | आमदार खोसकर आले अडचणीत; नाशकात चर्चाना उधाण.. नेमकं काय घडलं?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here