हिमाचल प्रदेशात पावसाने माजला हाहाकार; पत्त्याप्रमाणे कोसळला ९० वर्ष जूना रेल्वेपूल

0
15

दिल्ली – हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या ४८ तासांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे तिथल्या अनेक नद्यांना पूर आला आहे. तिकडे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून १३ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत असताना त्याचवेळी एक मोठी घटना घडली आहे.

मुसळधार पावसामुळे कांगडा जिल्ह्यातील पंजाब-हिमाचलच्या सीमेवरील चक्की नदीवर ९० वर्ष जुना असलेला ८०० मीटर लांबीचा रेल्वे पूल कोसळल्याची घटना घडली आहे. सोशल मिडीयावर पूल कोसळतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या ह्या व्हिडिओमध्ये तब्बल ९० वर्ष जूना असलेला रेल्वे पूल एखाद्या पत्त्याप्रमाणे कोसळताना दिसत आहे. सुदैवाने ह्या पुलावरून कोणतीही रेल्वे धावली नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्यातरी, नव्या पुलाचे बांधकाम होईपर्यंत रेल्वेने पठाणकोठ ते जोगिंदरनगर दरम्यान नॅरोगेज रेल्वेसेवा बंद केली आहे. १९२८ मध्ये ब्रिटिशांनी हा नॅरोगेज रेल्वेमार्ग सुरू केला. या रेल्वेपुलावरून ७ रेल्वे गाड्या धावत होत्या.

इथे सुरु असलेल्या अवैध उत्खननामुळे हा रेल्वे पूल कोसळण्याचे सांगण्यात येत आहे. तिथल्या खाण माफियांनी पुलाच्या दोन्ही बाजूने बेकायदेशीर उत्खनन केल्यामुळे पुलालगत चक्क खड्ड्याचा प्रवाह आवळला असून पुलाजवळील चक्की नाल्याचा प्रवाह केवळ १२-१५ मीटर आहे. त्यामुळेच हा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here