Hemant Godse | नाशिकचे राजकीय महत्त्व पाहता ही जागा आपल्याला मिळावी ही सर्वच पक्षांची मागणी आहे. त्यामुळे या जागेच तिढा हा महायुतीत देखील कायम आहे. दरम्यान, काल खासदार हेमंत गोडसे हे नाशिक लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दादा भुसे हेदेखील होते.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,”मी आता आपल्याला एवढंच सांगतो की, तुम्ही खंबीरपणे खासदार हेमंत गोडसेंच्या पाठिशी उभे राहा. कोणावरही कोणताही अन्याय होणार नाही. ७ ते ८ मतदारसंघ आहेत ज्यावर अजूनही चर्चा सुरु आहे. त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल. तुमच्या भावना आणि तुमचा आग्रह हा माझा आग्रह आहे. महायुतीत आपण जास्तीत जास्त जागा जिंकू. आणि जास्त जागा निवडून आल्या तर आपल्याला आपल्या कामांची पोहोचपावती मिळेलच”,असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Hemant Godse)
Shrikant Shinde | श्रीकांत शिंदेंनी केली हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा
Hemant Godse | देशामध्ये आगळ वेगळं वातावरण
तसेच यावेळी शिंदे म्हणाले की, “महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आज आगळं वेगळं वातावरण आहे. अजूनही जागा वाटपाबाबत चर्चा सुरु असून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात अनेक विकासकामे झाली आहेत. यामुळे अनेक लोक आपल्या शिवसेनेत प्रवेश करताय. महायुतीला पाठिंबा देताय. असंही यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. (Hemant Godse)
नाशिक आपला बालेकिल्ला
“नाशिक हा आपला बालेकिल्ला असून, आपल्याला पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राज्यासह देशात महायुतीचे सरकार आणायचे आहे. आपण यावेळी ४५ पार म्हणतो. त्यामुळे आपल्याला एक-एक जागा ही महत्वाची आहे. राज्यातील प्रत्येक खासदार आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. काही जागांबाबत बारीक चर्चा सुरु असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वतः यात लक्ष देत आहेत. मात्र, नाशिकची जागा ही आपल्या धनुष्यबाणाकडेच राहायला हवी. आपला या जागेसाठीचा आग्रह मी त्यांना सांगितला आहे. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवर, अफवांवर तुम्ही विश्वास ठेऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. (Hemant Godse)
Shrikant Shinde | मंत्री भुसे आणि श्रीकांत शिंदेंच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण
… म्हणून केले शक्तिप्रदर्शन
गेल्या काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, यानंतर नाशिकमध्ये महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून आले. नाशिकची जागा आपल्याकडे घ्यावी यासाठी भाजप आग्रही असून, हेमंत गोडसेंवर भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी आहे. त्यामुळेच गोडसेंच्या उमेदवारीवरून संभ्रम तयार झाला होता. त्यामुळेच गोडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाणे गाठले आणि ठाण्यात मुख्यमंत्र्यांसामोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मंत्री दादा भुसे यांनीही खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. (Hemant Godse)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम