द पॉईंट नाऊ ब्युरो : एक मोठी बातमी आहे. दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांना ईडीद्वारे रविवारी अटक करण्यात आली होती. त्यांना 9 जूनपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लॉनड्रिंग प्रकरणी रविवारी अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे राजकीय गोटात खळबळ माजल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांत बऱ्याचश्या मोठ्या मंत्र्यांना वेगवेगळ्या कारणास्तव अटक करण्यात आली आहे. याआधी महाराष्ट्रात नवाब मलिक, अनिल देशमुख असे बडे नेते अटकेत आहेत. तर नुकतेच पंजाबमधील आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना देखील अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून पायउतार करण्यात आले. आता दिल्लीमध्ये देखील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात येऊन 9 जून पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
आता याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम