Hatkanangle Lok sabha | आज देशासह राज्यात टप्प्याची मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात राज्यातील ११ हायव्हॉल्टेज मतदार संघाचा समावेश आहे. येथे अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळपासूनच मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत असून, नुकतंच आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Hatkanangle Lok sabha)
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचे धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्यात लढत रंगली आहे. दरम्यान, या मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते आपापसांत भिडले असून, येथे कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाल्याचे बघायला मिळाले. (Hatkanangle Lok sabha)
वाळवा तालुक्यातील साखराळे या गावातील बूथ क्रमांक ६२ आणि ६३ येथे हा राडा झाला असून, यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बुथमधून बाहेर काढले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यामुळे तणाव निवळला आणि पोलिसांनी वेळीच वाद मिटवल्याने अनर्थ टळला.
Maharashtra Politics | ‘वंचित’च्या महिला उमेदवाराच्या गाडीवर हल्ला
Hatkanangle Lok sabha | नेमकं प्रकरण काय..?
दरम्यान, साखराळे या गावातील मतदान केंद्र क्रमांक ६२ आणि ६३ येथे असलेल्या सत्यजित पाटील सरूडकर यांच्या बोगस प्रतिनिधींवर कारवाई करण्याची मागणी धैर्यशील माने यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच यामुळे त्यांनी मतदान केंद्र काही काळ बंद देखील ठेवले होते. यामुळेच सत्यजित पाटील यांचे कार्यकर्ते संतापले आणि हा रडा झाला.
सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी माने यांच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला असता दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची झाली आणि हाणामारी देखील झाली. दरम्यान, आता येथील घटनास्थळी तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर व वातावरण शांत झाल्यानंतर आता मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले आहे. (Hatkanangle Lok sabha)
Lok Sabha Election | हे कसले संकेत..!; मतदान सूरू असताना सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम