The point now – थंडीत फक्त चेहराच नाही तर संपूर्ण शरीर कोरडे पडते. हिवाळ्यात टाचांना भेगा पडल्याने लोकही खूप त्रासलेले असतात विशेषतः महिला वर्ग काही लोकांच्या टाचान मधून रक्तस्त्राव सुरू होतो. ज्यामुळे खूप वेदनाही सुरू होतात. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता कारण ते हया समस्या मुळापासून दूर करण्यास मदत करतील. चला तर मग जाणून घेऊया त्या टिप्सबद्दल
• तुम्हांला तुमच्या टाचांच्या भेगांपासून मुक्ती मिळवायची असेल तर स्क्रबिंग करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही साखर, मध आणि लिंबू वापरा. यामुळे तुमच्या टाचांमधील मृत पेशी(डेड स्किन)निघून जातील.
• तडे गेलेल्या टाचांपासून मुक्त होण्यासाठी मेण देखील खूप प्रभावी आहे. त्यात दोन थेंब तेल मिसळा आणि रात्री मोजे घाला आणि सकाळी स्वच्छ करा. याच्या मदतीने तुमच्या टाचांच्या भेगा हळूहळू बऱ्या होतील.
• तडे गेलेल्या टाचांपासून मुक्त होण्यासाठी मेण देखील खूप प्रभावी आहे. त्यात दोन थेंब तेल मिसळा आणि रात्री मोजे घाला आणि सकाळी स्वच्छ करा. यामुळे तुमची फाटलेली टाच हळूहळू बरी होण्यास सुरुवात होईल.
• तांदळाचे पीठ तुम्हांला भेगा पडलेल्या टाचांपासून आराम देण्यासाठी देखील प्रभावी आहे. तुम्हाला २ चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे आहे, त्यानंतर त्यावर १ चमचा मध, ३-४ थेंब सफरचंदाचा व्हिनेगर(एप्पल विनेगर) आणि ऑलिव्ह ऑइल किंवा खोबरेल तेल टाकून मसाज करा.
• भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठीही व्हॅसलीन प्रभावी आहे. तुम्हाला फक्त ते झोपण्यापूर्वी लावायचे आहे. यामुळे तुम्हाला लवकरच आराम मिळू लागेल. आणि टाचा दुखण्याचा त्रासही कमी होईल.
• याशिवाय टाचांच्या भेगा पडण्यापासून सुटका मिळवण्यासाठी कोमट पाण्यात पाय ठेवून बसा त्यानंतर टाचांना एका स्वच्छ दगडाने घासून स्वच्छ करा. त्यानंतर बदाम तेल किंवा खोबरेल तेल गरम करून टाचांवर लावा. याने तुमची टाचा फाटण्याची समस्या कमी होते आणि त्याचा त्रासही कमी होऊ लागतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम