एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आपल्या “मन की बात” या कार्यक्रमात भारतीयांना संबोधित करत भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी देशवासियांना, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव साजरे करावे असे आवाहन केले आहे. तसेच सर्व भारतीयांना विनंती केली आहे की त्यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर डिस्प्ले पिक्चर म्हणजेच DP म्हणून राष्ट्रध्वज, तिरंगा अथवा त्यासोबतचा आपला फोटो लावावा.
स्वतः आपल्या सर्व सोशल मीडिया आकाऊंट चे डीपी बदलून राष्ट्रध्वजाचा डीपी लावला त्यांच्या प्रमाणे गृहमंत्री अमित शहा पासून ते जवळपास सर्वच बीजेपी मंत्री, नेते, कार्यकर्त्यांनी आपले डीपी बदलून तिरंगा ठेवला. किंबहुना बीजेपी पक्षाशी संबंधीत नसलेल्यांनी देखील आपापले डीपी बदलले आहेत. परंतु BCCI सचिव व गृहमंत्री अमित शहा यांच्या पुत्राने अद्यापही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट चा डीपी न बदलून पंतप्रधान मोदींच्या विनंतीला केराची टोपली दाखवली आहे का असा प्रश्न अनुत्तरित राहतो.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम