Gram Panchayat Result | नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातून पहिला निकल हाती आला आहे. तर, मेशी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदावर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरेगट ) तालुकाप्रमुख बापू शांताराम जाधव हे १,१३९ मतांनी विजयी झाले आहेत.
मनसेने उघडले खाते
– नाशिक जिल्ह्यात मनसेने पहिले खाते उघडले आहे.
– जव्हाळे ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला आहे.
– संगीता कैलास गायकवाड ह्या ५५८ मते मिळवत थेट सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत.
– विरोधी उमेदवार शिवसेना ठाकरे गटाच्या सीमा भाऊसाहेब पागेरे यांना ३९४ मते मिळाली आहेत.
malegaon | दादा भूसेंविरोधात मोर्चा
अपक्षांचा झेंडा
– नाशिक तालुक्यातील सुभाषनगर ह्या ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा फडकला आहे. जिल्ह्याचा पहिलं निकाल हा आपक्षांच्या बाजूने लागला आहे.
– दरम्यान, अपक्ष उमेदवार मनीषा फसाळे ह्या सरपंच पदी विजयी झाल्या आहेत.
८३.२६ टक्के मतदान
देवळा तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवार (दि .५) रोजी ८३.२६ टक्के इतके मतदान झाले. सर्वाधिक मतदान हे मेशी ग्रामपंचायतीसाठी ८४.५८ टक्के इतके झाले, तर सर्वात कमी मतदान माळवाडी येथे ७८.२५ टक्के इतके झाले आहे.
तालुक्यात ३ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या तीन जागांसाठी नऊ आणि सदस्यांच्या १४ जागांसाठी ४३ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. दरम्यान, मतदान प्रक्रिया ही शांततेत पार पडली असून, आज सकाळी १० वाजेपासून नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार आहे.
तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान असे, मेशी प्रभाग १ – ७५३, प्रभाग २ -७८२, प्रभाग ३ – ७६१, प्रभाग ४ -६८६, प्रभाग ५ -६५५ अर्थात ४३०० पैकी ३६३७ मतदान झाले आहे. फुलेमाळवाडी येथे ८४.१६ टक्के मतदान झाले. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष आहे. यात सर्वसाधारण जागांसाठी अधिक रस्सीखेच दिसत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम