Nashik | हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात नाशिक, धुळ्यासह उत्तर महाराष्ट्र, मुंबई, सातारा, छत्रपती संभाजीनगरला रविवारी (दि. २६) गारपिटीने झोडपून काढलेले आहे. नाशिक जिल्ह्यात दुपारनंतर सुमारे दोन तास झालेल्या गारपिटीने द्राक्षासह कांदा, गहू, भात, मका या पिकांना मोठा तडाखा बसला आहे. गारांचा जोर एवढा होता की द्राक्षांना त्यांनी अक्षरशः सोलपटून काढले. बागलाण तालुक्यातील साल्हेरसह नंदूरबारमध्ये वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. आधीच दुष्काळसृश्य परिस्थितीने बेजार झालेला शेतकऱ्याच्या पाठीवर आजच्या अस्मानी संकटाने वार केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नाशिकमध्ये १४ मिमी पाऊस झाला आहे. लासलगावमध्ये सुमारे दोन तास गारपिट झाली. निफाड परिसरात द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. कांदा रोपे आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.
Nashik News | आज नाशिक जिल्ह्यात असे असणार हवामान
चांदवडच्या दक्षिण-पूर्व भागात गारपीट
रेडगाव खुर्द तालुक्यातील दक्षिण पूर्व भागातील वाकी, काळखोडे, तळेगाव, कातरवाडी, वडगा पंगु आदी गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. परिसरात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह गारपिटेने जोरदार हजेरी लावल्याने कांदा भुईसपाट झाला, तर द्राक्षबागांचेही नुकसान झाले. गारांचा मारा जोरदार असल्याने घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. अत्यल्प पाण्यावर थोडाबहुत जगवलेला कांदा, द्राक्ष बाग यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आता शेतकरी हवालदिल झाला आहे. चांदवड तालुक्यात कांद्यासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. दिंडोरी तालुक्याच्या पूर्व भागात द्राक्ष भात पिकासह भाजीपाल्याचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. मनमाड परिसराला गारपिटीने अक्षरशः झोडपून काढलेले आहे.
देवळा | लैंगिक अत्याचार प्रकरणी उमराणे गाव कडकडीत बंद; आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी
शेतकऱ्यांच्या पाठीची सरकार खंबीरपणे उभे, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये – पालकमंत्री दादा भुसे
राज्यभरात काल पासून अवकाळीने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. यात नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील प्रचंड फटका बसला आहे. आज सकाळी निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या सोबत सरकार खंबीरपणे उभे आहे. तातडीने नुकसानग्रस्त भागाच्या पंचनामा करण्याचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी खचू नये सरकार यातून सकारात्मक तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा देईल. जिल्ह्यातील पिंपळगांव व निफाड तालुक्यातील नुकसानीची सकाळी प्रत्यक्ष बांधावर जाऊन पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे असे आवाहन याप्रसंगी पालकमंत्री यांनी केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम