समाज व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सदैव दक्ष रहा ; महामंडलेश्वर रघुनाथदासजी फरशीवाले बाबा

0
18
देवळा : येथील डॉ.दौलतराव आहेर सभागृहात आयोजित संत संमेलनात बोलताना त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर रघुनाथदासजी फरशीवाले बाबा समवेत प्रदीप बच्छाव, संजय धोंडगे, शिवाजीराव मोरे, राजेंद्र देशपांडे, मनीषादिदी आदी (छाया - सोमनाथ जगताप )
देवळा : येथील डॉ.दौलतराव आहेर सभागृहात आयोजित संत संमेलनात बोलताना त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर रघुनाथदासजी फरशीवाले बाबा समवेत प्रदीप बच्छाव, संजय धोंडगे, शिवाजीराव मोरे, राजेंद्र देशपांडे, मनीषादिदी आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : एकत्र कुटुंबपद्धती व देशी वृक्षांची लागवड याबाबत जनजागृती करत समाज व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सदैव दक्ष राहून राष्ट्रनिर्माणच्या कार्यात सक्रिय रहा असे आवाहन त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर रघुनाथदासजी फरशीवाले बाबा यांनी केले. येथील डॉ.दौलतराव आहेर सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित संत संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सहधर्माचार्य राजेंद्र सारंगे यांच्यासह कळवण, सटाणा व देवळा तालुक्यातील संत, महंत, कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार उपस्थित होते.

देवळा : येथील डॉ.दौलतराव आहेर सभागृहात आयोजित संत संमेलनात बोलताना त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर रघुनाथदासजी फरशीवाले बाबा समवेत प्रदीप बच्छाव, संजय धोंडगे, शिवाजीराव मोरे, राजेंद्र देशपांडे, मनीषादिदी आदी (छाया - सोमनाथ जगताप )
देवळा येथील डॉदौलतराव आहेर सभागृहात आयोजित संत संमेलनात बोलताना त्र्यंबकेश्वर येथील महामंडलेश्वर रघुनाथदासजी फरशीवाले बाबा समवेत प्रदीप बच्छाव संजय धोंडगे शिवाजीराव मोरे राजेंद्र देशपांडे मनीषादिदी आदी छाया सोमनाथ जगताप

या संत संमेलनाचे प्रास्ताविक संत संपर्क संयोजक परिमल जोशी यांनी केले. सामाजिक समरसता या विषयावर पहिले पुष्प गुंफतांना धर्मजागरण विभागाचे पश्चिम महाराष्ट्र जनजागृती प्रमुख प्रदीप बच्छाव म्हणाले की, समाजातील जातिभेद संपवत हिंदू समाजाने एकोप्याने राहावे तर संगमनेरचे राजेंद्र देशपांडे यांनी कुटुंबप्रबोधन यावर भाष्य केले. ते म्हणाले की, कुटुंबरचना टिकून राहिली तरच समाज आणि संस्कृती वाढीस लागेल. बालसंस्कार झाले तर मुल व्यसनाधीन होणार नाहीत. आणि सामाजिक विकास होईल. संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज तथा पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त शिवाजीराव मोरे यांनी पेड, प्लास्टिक व पाणी याबाबत सजग होण्याची गरज असल्याचे सांगितले. किर्तनकारांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजात पोहोचवावा असे आवाहन केले. सिद्धारूढ आश्रमाच्या मनीषादिदी यांनी धर्मो रक्षति रक्षिता.. याबाबत विवेचन केले.
Subsidy Offer: हरितगृह उभारण्यासाठी सरकार 70% अनुदान देत आहे, शेतकरी फक्त एका क्लिकवर अर्ज करू शकतात
या संतसंमेलनात देवदारेश्वरचे गणेशानंदपुरीजी महाराज, हभप संजय धोंडगे, नंदन सर यांनी प्रत्येक किर्तनात, प्रवचनात धर्म व राष्ट्र याबाबत विषय मांडावेत असे सांगितले. यावेळी ब्रम्हकुमारी दिपमाला, सुनीतादिदी, स्वामी समर्थ केंद्राच्या सुरेखा आहेर, वारकरी संप्रदायाच्या सुशीला आहेर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उपस्थित होते. सुभाष बच्छाव, कैलास वाघ, लौकिक जोशी, राहुल वाघमारे, संघाचे जिल्हा ग्रामविकास प्रमुख बापू शिंदे, तालुका कार्यवाह पुंडलिक आहेर, सानप दादा, श्यामराव सूर्यवंशी, निनाद मगर, उमेश देवरे, काशिनाथ सोनवणे, बाप्पा महाजन आदींनी या संमेलनाचे संयोजन केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here