देवळा महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0
25
देवळा महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना प्राचार्य हितेंद्र आहेर समवेत शिक्षक व विद्यार्थी आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अजरामर आहे.आज त्यांच्या जयंतीनिमित्त देवळा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर,डॉ.डी.के आहेर,मुख्याध्यापिका प्रतिभा सागर,मुख्याध्यापक दिलीप आहेर, कलाशिक्षक भास्कर सोनवणे उपस्थित व विद्यार्थीनी उपस्थित होते.

देवळा महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना प्राचार्य हितेंद्र आहेर समवेत शिक्षक व विद्यार्थी आदी (छाया – सोमनाथ जगताप )

यानिमित्ताने कलाशिक्षक चित्रकार भारत पवार यांनी रंगीत खडूच्या सहाय्याने अतिशय आखीव रेखीव पध्दतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे हुबेहूब चित्र रेखाटले आहे.तसेच सोसियल मीडिया च्या माध्यमातून हे चित्र व्हायरल झाले आहे.भारत पवार यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.यानिमित्ताने त्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here