जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या संघटक पदी देवळा येथील निंबा सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड

0
39
नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हा संघटक निंबा सूर्यवंशी समवेत युनियनचे जिल्हा अध्यक्ष कैलास वाघचौरे, सरचिटणीस रवींद्र शेलार आदी ( छाया- सोमनाथ जगताप )

देवळा : नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या जिल्हा संघटक पदी देवळा येथील निंबा सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा ग्रामसेवक युनियनची आज दि १८ रोजी नाशिक येथे बैठक झाली. या बैठकीत युनियनच्या जिल्हा अध्यक्ष पदी कैलास वाघचौरे यांची फेरनिवड करण्यात आली. तर सरचिटणीस पदी रवींद्र शेलार , संघटक पदी निंबा सूर्यवंशी आदी कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.

नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हा संघटक निंबा सूर्यवंशी समवेत युनियनचे जिल्हा अध्यक्ष कैलास वाघचौरे, सरचिटणीस रवींद्र शेलार आदी ( छाया- सोमनाथ जगताप )

या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे देवळा तालुका अध्यक्ष योगेश पगार, सचिव संभाजी देवरे, सहसचिव जयश्री आहेर, उपाध्यक्ष -रामकृष्ण अहिरराव, जयश्री निकम , संघटक- सरिता मिस्तरी , नंदू सोनवणे , सल्लागार – जिभाऊ देवरे , लेखापरीक्षक -अनिल आहेर आदींसह राजश्री देसले , पूनम सोनजे , निंबा सूर्यवंशी , अरुण आहेर , विजय सोळसे , यू बी खैरणार , जगन्नाथ शिंदे , श्रीमती सोनार ,वैशाली येळीज यांनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here