
देवळा | सोमनाथ जगताप
देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शुक्रवार (दि.२) अखेरच्या दिवशी काही गावातील सदस्यांच्या जागांवर बिनविरोध निवड होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी जोरदार रस्सीखेच असून १३ सरपंच पदांसाठी तब्बल ५६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण १२२ जागांसाठी ३४९ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत .

देवळा तालुक्यातील विठेवाडी, खामखेडा, वाखारवाडी ( श्रीरामपूर), डोंगरगाव, भऊर, वाजगाव, कणकापूर, चिंचवे, फुलेनगर, वासोळ, सरस्वतीवाडी, मटाणे, दहिवड या तेरा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. यामुळे तहसील कार्यालयात गर्दी दिसून आली.
ग्रामपंचायतनिहाय दाखल झालेले उमेदवारी अर्ज असे –
विठेवाडी -सरपंचपदासाठी ३ उमेदवारी अर्ज तर सदस्यांच्या ९ जागांसाठी ३९ अर्ज.
खामखेडा सरपंचपदासाठी ३ आणि सदस्यांच्या ९ जागांसाठी २४ अर्ज.
सरस्वतीवाडी –सरपंचपदासाठी सर्वाधिक १० अर्ज तर ९ जागांसाठी १९ अर्ज.
चिंचवे -सरपंचपदासाठी ९ अर्ज तर ९ जागांसाठी २६ अर्ज
वाखारवाडी -सरपंचपदासाठी ३ अर्ज तर ९ जागांसाठी २२ अर्ज.
डोंगरगाव – सरपंचपदासाठी ३ अर्ज तर ९ जागांसाठी १३ अर्ज
भऊर -सरपंचपदासाठी ४ अर्ज तर ११ जागांसाठी २७ अर्ज.
कणकापूर – सरपंच पदासाठी ५ तर ९ जागांसाठी २९ अर्ज.
मटाणे -सरपंचपदासाठी ३ अर्ज तर ९ जागांसाठी २४ अर्ज.
वाजगाव -सरपंचपदासाठी ३ अर्ज तर ११ जागांसाठी ३४ अर्ज.
वासोळ -सरपंचपदासाठी ४ अर्ज तर ९ जागांसाठी ३४ अर्ज.
फुलेनगर -सरपंचपदासाठी ३ अर्ज तर ७ जागांसाठी ९ अर्ज.
दहिवड – सरपंच पदासाठी तर १२ सदस्यांसाठी ४९ अर्ज दाखल झाले.
आज १३ ग्रामपंचातींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्याने देवळा तहसील कार्यालयाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले. कुढलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व उमेदवारी अर्जाची छाननी ५ डिसेंबर रोजी होणार असून माघारीसाठी ७ डिसेंबरला अखेरची मुदत आहे. माघारीनंतर उर्वरित जागांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम