देवळा तालुक्यातील सविस्तर निकाल ; प्रस्थापितांना धक्का तर तरुणाईची बाजी

0
47
देवळा : सटवाईवाडी ता.देवळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर जल्लोष करताना थेट सरपंच चंद्रकांत आहेर समवेत पॅनलचे उमेदवार व समर्थक कार्यकर्ते (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १० ग्रामपंचायतींमध्ये भाजपने मुसंडी मारत आपले प्राबल्य दाखवून दिले असून इतर तीन गावात राष्ट्रवादी व अपक्ष उमेदवारांनी वर्चस्व राखले. विशेष म्हणजे बहुतांश गावात युवा वर्गाच्या नेतृत्वास वाव मिळाला आहे. तालुक्यातील १३ ग्रामपंचायत निवडणूकिंचि मतमोजणी आज मंगळवार (दि.२०) रोजी येथील प्रशासकीय कार्यालयात पार पडली.

देवळा : सटवाईवाडी ता.देवळा येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर जल्लोष करताना थेट सरपंच चंद्रकांत आहेर समवेत पॅनलचे उमेदवार व समर्थक कार्यकर्ते (छाया – सोमनाथ जगताप )

मटाणे व भऊर येथील सरपंचपद बिनविरोध झाल्याने इतर ११ गावांच्या सरपंचपदासाठी ३० उमेदवारांची तर फुलेनगर येथील सर्व सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याने उरलेल्या १२ गावांच्या ७७ सदस्यांसाठी १६१ उमेदवारांची मतमोजणी येथे झाली. विठेवाडी, कणकापूर, वाजगाव, सटवाईवाडी, खामखेडा अशा काही ठिकाणी चुरस दिसून आली.

निकाल याप्रमाणे : दहिवड थेट सरपंच – पुष्पा संदीप पवार ( २१७२) , सदस्य वार्ड क्रमांक १ ; केदा भिका गायकवाड (३२७), आशा पिंपळसे (३४१) , वार्ड क्रमांक २ राजाराम फुला ठाकरे ( ६०९) , दिंगबर दामू वाघ ( ४९०) , वार्ड क्रमांक ३ गुंताबाई निंबा सोनवणे ( २६०) , वार्ड क्रमांक ४ सुनील भिमराव अहिरराव ( ३९४) , सुनंदा राजाराम ठाकरे ( ३७७) , वार्ड क्रमांक ५ सुनंदा राजाराम ठाकरे ( २८७)

फुलेनगर थेट सरपंच –निंबा भिला अहिरे ( ३६९) ,

वासोळ – थेट सरपंच – स्वप्नील भाऊसाहेब अहिरे ( १२१० ) , सदस्य वार्ड क्रमांक १ भारत किसन अहिरे ( ३४२) , अनुसयाबाई किसन अहिरे ( ३५२) , अलकाबाई वसंत पगार ( ३७३) , वार्ड क्रमांक २-मंगळ काशिनाथ अहिरे ( ४११) , वार्ड क्रमांक ३ संजय मांगु खुरसाने ( ४१३) , दरबारसिग केशरसिंग गिरासे ( ४१९) , इंदुबाई यशवंत केदारे ( ४४९)

भऊर वार्ड क्रमांक १ सुनीता संजय पवार ( ३४४), वार्ड क्रमांक २ रवींद्र जिभाऊ पवार ( ५२४ ) , सीमा राजेंद्र गरुड ( ४२९) , वार्ड क्रमांक ३ काशिनाथ नागू पवार ( २७९) , वार्ड क्रमांक ४ ज्योती दीपक पवार ( ३५२)

खामखेडा थेट सरपंच वैभव धर्मा पवार ( १५३३ , ) , सदस्य वार्ड क्रमांक १ गणेश मन्साराम शेवाळे ( ४०९) , रेखा सुरेश पवार ( ४६४) , सुशीला जयराम शेवाळे ( ४४४) , वार्ड क्रमांक २ अंबर भिवसेन सोनवणे ( ४६३) , ज्योती योगेश सोजल ( ५१०) , विमलबाई दादाजी मोरे ( ४५२) , वार्ड क्रमांक ३ रामचंद्र बाबूंराव बोरसे ( ५९३) , श्रावण तुळशीराम बोरसे ( ५५८)

मटाने वार्ड क्रमांक ३ अनिता दीपक आहिरे (१४९) ,

विठेवाडी थेट सरपंच – नानाजी केदा पवार ( १०९६) सदस्य वार्ड क्रमांक १ भाऊसाहेब केदा पवार ( २३८) , सुनंदा विठोबा सोनवणे ( २७९) , वार्ड क्रमांक २ केवळ पंडित पवार ( ३३०) , भारती विलास पवार (३४०) , इंदुबाई भास्कर निकम ( ३८४) , वार्ड क्रमांक ३ बापू काळू जाधव ( ३५६) , राहुल बापू निकम ( ३४४) , पल्लवी सुनील बोरसे ( ३०१) , वार्ड क्रमांक ४ ईश्वर दादाजी निकम ( २८७) , सयाबाई सुरेश गांगुर्डे ( ३०७) , सीताबाई केवळ पवार ( २८५) ,

डोंगरगाव थेट सरपंच – पॊर्णिमा देवाजी सावन्त ( ७९५ ) , वार्ड क्रमांक २ कृष्णाजी जयवंत सावंत ( ३४९)

वाजगाव थेट सरपंच -शिंदूबाई आण्णा सोनवणे ( ११७९) , सदस्य वार्ड क्रमांक १ ज्ञानेश्वर काळू शिंदे ( ३३८) , मोतीलाल कारभारी सोनवणे (३५१) , मंजुळा शिवदास जाधव ( ३५९) , वार्ड क्रमांक २ साहेबराव बाजीराव मोरे ( २९३) , पुष्पा सुरेश वाघ ( २९४) , वार्ड क्रमांक ३ रवींद्र हिरामण मोरे ( ३३०) , मंदाकिनी विजय देवरे ( ३२३) , वार्ड क्रमांक ४ सुनील नरहरी देवरे ( ३०८) , धनश्री दिनकर ढवळे ( ३४१) , लक्ष्मीबाई हिरामण मोरे ( ३२६).

कनकापूर थेट सरपंच बारकू मंगळू वाघ ( ६३४ ) सदस्य वार्ड क्रमांक १ किरण लहानू गांगुर्डे ( २३८ ) , बिबाबाई हिरामण बच्छाव (२५२), अनुराधा तुळशीराम जैन ( ३२१) , वार्ड क्रमांक २ – जगदीश नानासाहेब शिंदे ( २१७ ) सुशिलाबाई सुरेश पवार ( २५३) , बिजलाबाई सुरेश बर्डे (१७२) ; वार्ड क्रमांक ३ पांडुरंग देवमन पिंपळसे ( २२४), गोविंद आनंदा बर्वे ( २६९) जिजाबाई पोपट मोरे ( २३७)

श्रीरामपूर थेट सरपंच -लीलाबाई भिवसन पवार ( ६५२) सदस्य वार्ड क्रमांक १ साहेबराव लाला पवार (२५४) , जगदीश अभिमन निकम ( २६७) , वंदना साहेबराव निकम ( २९७) , वार्ड क्रमांक २ लाला धर्मा पवार ( २७६) प्रशांत त्रंबक निकम ( २९६) ,

सटवाई वाडी थेट सरपंच -चंद्रकांत दादाजी आहेर ( ६७६, ) , वार्ड क्रमांक २ शांताराम नानाजी भालेराव (३२३), मनीषा प्रवीण वाघ (२८०), वॉर्ड क्र. ३ अंजनाबाई विष्णू सोनावणे (२५६) , सोनाली विकास आहेर (३०४), चिंचवे – सरपंच -वैशाली योगेश पवार (९९३) ; वॉर्ड क्र. १ – बायजाबाई प्रकाश पवार (४७५), वॉर्ड २ – शीतल रविंद्र पवार (३६६), वॉर्ड ३ – भाऊसाहेब महादू पवार ( ३१७) , उज्ज्वला राजाराम गांगुर्डे (४७९)

विजयी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष व आनंदोत्सव साजरा केला. मतमोजणी प्रसंगी तहसीलदार विजय सूर्यवंशी व नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी संयोजन केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here