
देवळा: नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी थंडावली मात्र आता सत्ता स्थापनेसाठी सर्व्यांच्या नजरा निवडणूक आयोगाच्या तारखानकडे होत्या अन् अखेर त्या जाहीर झाल्या आहेत. तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली या निवडणूक प्रक्रियेअगोदर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचे गत फेब्रुवारी महिन्यातच सरपंच प्रवर्ग व महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.
देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया ४ ऑगस्ट रोजी पार पडली व ५ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात आले यामध्ये काही ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले तर काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले आहे.
निकाल जाहीर झाल्यापासून सरपंच पदाची निवडीची उत्सुकता लागून होती सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक येत्या २५ ऑगस्ट गुरुवारी पार पडणार असल्याची माहिती देवळा तहसीलदार विजय सूर्यवंशी,नायब तहसीलदार विजय बनसोडे यांनी दिली आहे.
तालुक्यातील विजयनगर, पिंपळगाव, खुंटेवाडी, शेरी, रामेश्वर, सुभाषनगर, सावकी, खर्डे, खडकतळे, गुंजाळनगर, वाखारी, कापशी, वार्षी या तेरा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सर्वांचेच लक्ष सरपंच आणि उपसरपंच निवडीच्या तारेखकडे लागले होते.
अखेर सरपंच-उपसरपंच निवडीची तारीख ठरली असून येत्या २५ ऑगस्ट रोजी सरपंच आणि उपसरपंचाची निवड प्रक्रिया घेण्यात येणार असून अर्ज भरणे, माघार आणि अंतिम निवड याच दिवशी होणार असून सर्वांचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.
ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण कोणते असणार ते खालीलप्रमाणे :
विजयनगर – अनुसूचित जमाती महिला
पिंपळगाव – अनुसूचित जमाती
खुंटेवाडी – अनुसूचित जमाती महिला
शेरी – अनुसूचित जमाती
रामेश्वर – अनुसूचित जमाती
सुभाषनगर – अनुसूचित जमाती
सावकी – अनुसूचित जमाती महिला
खर्डे – अनुसूचित जमाती
खडकतळे – अनुसूचित जमाती
गुंजाळनगर – अनुसूचित जमाती
वाखारी – अनुसूचित जमाती महिला
कापशी – अनुसूचित जमाती महिला
वार्षी – अनुसूचित जमाती महिला
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम