१३ ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध ; बघा हरकती कधी पर्यंत घेणार

0
67

देवळा ; राज्य निवडणूक आयोग यांचेकडील दि. 2 जून 2022 रोजीच्या आदेशान्वये माहे जानेवारी 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार याद्या (दि 14) रोजी तलाठी व ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर याद्या या तहसिल कार्यालय देवळा येथे उपलब्ध आहेत.

पुढील प्रमाणे 13 ग्रामपंचायत विजयनगर, पिंपळगाव, खुंटेवाडी, शेरी, रामेश्वर, सुभाषनगर, सावकी, खर्डा, खडकतळे, गुंजाळनगर, वाखारी, वार्षि, कापशी. या ग्रामपंचायतीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्याने ज्यांना उपरोक्त ग्रामपंचायतीच्या मतदार याद्या बाबत हरकती घ्यावयाच्या असल्यास, त्यांनी (दि. 17) जून पर्यंत संबंधित ग्रामपंचायतीची मतदार यादि बाबत लेखी हरकत तहसील कार्यालयात दाखल करावी. (दि 17) नंतर उपरोक्त ग्रामपंचायतीची कुठलीही हरकत तहसील कार्यालयात स्विकारली जाणार नाही. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here