ग्रामपंचायत निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात ; राज्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षणसोडत 6 जूनला

0
18

नाशिक प्रतिनिधी : गावगाड्याचा कारभार हाकण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजनले असून यात राज्यभरातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे, कोरोनाच्या काळात मुदत संपून देखील निवडणुका न झाल्याने ग्रामपंचायतींवर सद्या प्रशासक आल्याने सद्या धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत असल्याने लवकरच गावकऱ्यांनी निवडून दिलेल्या सदस्यांच्या ताब्यात गावाचा कारभार जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 6 जूनला संपुर्ण राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत होणार आहे

यात देवळा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसाठी ६ जूनला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांचे पुन्हा एकदा धाबे दणाणले असून निवडणुकींच्या कामाला लागावे लागणार असल्याने त्यांनी आतापासूनच पॅनल तसेच प्रत्येक वॉर्डातील उमेदवार कोणाला देणार याचा शोध घेण्यास सुरवात झाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकां ह्या गावपातळीवर अतिशय प्रतिष्ठेच्या होत असतात, देवळा तालुका राजकीय दृष्टया संवेदनशील असून गाव पातळीवर वेगळीच रंगत चढणार आहे. आरक्षण सोडत संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी पत्र प्रसिद्ध केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here