Accident : त्या अपघातातील मृतांना आणि जखमींना शासकीय मदत जाहीर….

0
23

Accident : आज दुपारी एक वाजेच्या सुमारास धुळे शहरात नजीक असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरून जात असताना एका कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर बस स्थानक परिसरात उभे असलेले प्रवासी आणि वाहनांवर जाऊन धडकला आणि यामध्ये दहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात जवळपास 20 हून अधिक लोक गंभीररीत्या जखमी झालेत.. या अपघाताची भीषणता इतकी जास्त होती की, यामध्ये वाहनांचा अक्षरशः चुराडा झालाय. दरम्यान या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे तर जखमींना देखील शासन आर्थिक मदत करणार असल्याचं शासनाने दिल आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि जखमींना तातडीने धुळे शिरपूर या ठिकाणी उपचार अर्थ दाखल करण्यात आला आहे या अपघातामध्ये लहान बालकांचा देखील मृत्यू झालाय. महामार्गावर हा अपघात झाल्याने या ठिकाणी वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला होता. तर काही तासात बचाव कार्य राबवत संबंधित प्रशासनाने या ठिकाणची वाहतूक सुरळीत केली. Accident  मात्र या महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

 

मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पळसाने गावामध्ये आज दुपारच्या सुमारास कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात झाला यावेळी बस स्थानकावर उभ्या असलेल्या प्रवाशांसह दोन मोटरसायकलस्वार आणि तीन वाहनांवर हा कंटेनर जाऊन धडकल्यामुळे जवळपास 25 हून अधिक लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत accident  तर दहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जखमींना उपचारासाठी धुळे शिरपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आला आहे तर मृतांच्या वारसांना शासनाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे या वाढत्या अपघातांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येतील

जलज शर्मा – जिल्हाधिकारी – धुळे


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here