देवळा : देवळा तालूक्यातील खर्डे येथिल सहकार क्षेञातील अग्रगण्य अशा गोरक्षनाथ ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची पंचवाषिक निवडणुक संस्थेचे संस्थापक चेअरमन डाॅ बाबाजी ह्याळिज व संस्थापक व्हा चेअरमन विनोद देवरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली. बिनविरोध निवडुन आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी वसंत गवळी यांनी कामकाज बघितले .
गावकऱ्यांच्या विरोधापुढे प्रशासन नमले; वाळू ठेका होणार रद्द
संस्थेवर बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ पुढीलप्रमाणे–
सर्व साधारण गट
डाॅ बाबाजी दादाजी व्हाळिज , विनोद धर्मराज देवरे,
बापू दौलतराव शिंदे , विजय जिभाऊ सोनवणे , हसंराज नारायन जाधव ,नानाजी राजाराम निकम ,
दौलतराव राघू भामरे ,
इतर मागासवर्गीय गट
– गुलाबराव उखा पवार
महिला राखिव गट
– उज्वला दिनकर पवार , बायजाबाई पुंजाराम पवार
भटक्या विमुक्त जाती जमाती गट
– ज्ञानेश्वर गंगाधर साबळे
अनुसूचित जाति जमाती गट
– कौतिक पांडू पवार
याप्रमाणे ,दरम्यान ,सोमवारी दि १५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी संस्थेच्या एकूण १२ जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळाच्या घोषणेला फक्त औपचारिकता बाकी आहे . अशी माहिती निवडणुक निर्णय आधिकारी वसंत गवळी यांनी दिली. नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सर्वञ अभिनंदन होत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम