Good news ; आता शासकीय रुग्णालयात केसपेपर सह अनेक चाचण्या होणार निशुल्क? ; लवकरच होणार निर्णय

0
22

Good news : शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी आधी पैसे खर्च करून केसपेपर व विविध चाचण्यांसाठी खर्च करावा लागत होता. मात्र आता सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर काढण्यापासून ते विविध चाचण्या निशुल्क केले जाणार आहेत.good news

शासकीय रुग्णालयामध्ये अतिशय कमी खर्चामध्ये उपचार होतात म्हणून सर्वच रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांची गर्दी बघायला मिळते. मात्र अनेकांना नाममात्र शुल्क देखील देणे शक्य नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता सरकारी रुग्णालयांमध्ये केस पेपर काढण्यापासून ते विविध चाचण्या निशुल्क केल्या जाण्याची शक्यता आहे.breaking news

यासाठी सर्व शिधापत्रकधारक अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच लागू करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर आता राज्यातील आरोग्य केंद्रापासून ते शासकीय रुग्णालयापर्यंत केस पेपर पासून ते विविध चाचण्या यांनी शुल्क केल्या जाणार आहेत.breaking news

राज्याच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला असून लवकरात लवकर हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर शासनाचा जवळपास 70 कोटी रुपयांचा महसूल बुडणार असला तरी मात्र आरोग्य सेवा ही महत्त्वाची आपत्कालीन सेवा असल्याने राज्यभरामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागान अंतर्गत विविध स्तरावर विविध प्रकारच्या आरोग्य संस्था काम करत आहेत. यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे.good news

https://thepointnow.in/railway-massacre/

राज्य सरकारची महाराष्ट्रामध्ये एकूण दहा हजार 780 उपकेंद्र तर 1906 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्राद्वारे दररोज हजारो लोक उपचार घेत असतात. राज्यामध्ये 23 जिल्हा शासकीय रुग्णालय असून ग्रामीण भागात देखील आरोग्य केंद्र आणि उभारण्यात आलेली शासकीय रुग्णालय सर्वसामान्यांसाठी संजीवनीच काम करत असतात आणि या ठिकाणी कमी खर्चामध्ये उपचार होत असल्याने याचा मोठा आधार सामान्य नागरिकांना मिळतो. यामुळे मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाण्याऐवजी सरकारी रुग्णालयांमध्ये जाण्यासाठी सर्वसामान्यांचा ओघ दिसून येतो.good news

याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार असल्याची माहिती समोर आली असून हा प्रस्ताव लवकरच मंजूर केला जाणार असल्याचे देखील सांगितलं जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here