Thane : ठाण्याच्या नागरी वस्तीत शिरला सोनेरी कोल्हा, दुर्मिळ प्राणी बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

0
47

Thane : काही दिवसांपूर्वीच नागरी भागात बिबट्या घुसल्याची घटना ताजी असतानाच आता ठाण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नौपाडा परिसरात सोनेरी कोल्हा आढळून आला आहे. सोनेरी कोल्हा दिसताच नागरिकांमध्ये खळबळ उडाली.

Farmer Suicide : आदर्श घोटाळ्यात २२ लाख बुडाले, शेतकऱ्याची आत्महत्या..

त्यानंतर वनविभागाच्या पथकाने सोनेरी कोल्ह्याला नौपाडा परिसरातून जेरबंद केलं असून वैद्यकीच चाचणीनंतर  सोनेरी कोल्ह्याला पुन्हा जंगलात सोडुन दिलं जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Saroj aher : शरद पवार वडीलांसारखे अजित पवार भावासारखे म्हणत आ.सरोज आहेर यांनी स्पष्ट केली आपली भूमिका

वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून घटनेची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. ठाण्याजवळील जंगलातून हा दुर्मिळ प्राणी शहरात आला होता. सुदैवाने सोनेरी कोल्ह्याने कुणावरही हल्ला केला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ठाण्यातील नौपाडा येथील भास्कर कॉलनी परिसरात काही लोकांना दुर्मिळ सोनेरी कोल्ह्याचं दर्शन झालं.

या घटनेची माहिती कळताच वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्वयंसेवकांनी रेस्क्यू करत सोनेरी कोल्ह्याला जेरबंद केलं आहे.

नर जातीचा सोनेरी कोल्हा जेरबंद करण्यात आला असून त्याची सर्वप्रथम वैद्यकीय चाचणी केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर त्याला ठाण्याजवळील जंगलात सुखरुप सोडलं जाणार असल्याचं वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशनकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी सोनेरी कोल्ह्याला पाहण्यासाठी नौपाड्यातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.

काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईतील वाशी आणि ठाकुर्ली परिसरातील नागरिकांना सोनेरी कोल्ह्याचं दर्शन झालं होतं. त्यानंतर आता ठाण्यातील नौपाडा परिसरात सोनेरी कोल्हा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. परिसरातील काही लोकांनी कोल्ह्याचा व्हिडिओ शूट करत त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. त्यानंतर आता नौपाडा परिसरातून सोनेरी कोल्ह्याला जेरबंद करण्यात आलं असून वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याला जंगलात सोडलं जाणार आहे. यावेळी पथकाला नौपाडा येथील स्थानिकांनी मदत करत प्राणी वाचवण्याचा संदेश दिला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here