Gold Silver Rate | सोने-चांदीची विक्रमी घोडदौड; असा आहे आजचा दर

0
23
Gold Price Today
Gold Price Today

Gold Silver Rate | सोने-चांदीचा आलेख हा सातत्याने उंचावत आहे. मागील आठवड्यापेक्षाही या आठवड्यात सोने-चांदीची तुफान बॅटिंग सुरु आहे. दिवाळीच्या दरम्यान सोने-चांदीचे दर वाढले होते. किंमतींमधील वाढीला अजूनही मोठा ब्रेक लागलेला नाही. याउलट ह्या मौल्यवान धातुंच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढच होत आहे. ह्या दोन आठवड्यात सोने-चांदीच्या किंमतींनी सलग दरवाढीची सलामी ठोकलेली आहे.

सोने हे लवकरच ६५,००० रुपयांचा विक्रमी (Gold Silver Rate) टप्पा गाठण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर, चांदी देखील याकाळात मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन लग्न सराईत सामान्य ग्राहकांच्या तोंडच पाणी पळालं आहे. शहरी भागात काही नागरिकांनी तर, सोन्याला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. ह्या ग्राहकांनी प्लॅटिनला पसंती दर्शविली असून, आता प्लॅटिनमच्या दागिन्यांची मागणी ही बाजारात वाढली आहे. जाणून घ्या काय आहे सोने-चांदीचा आजचा भाव?

सोन्याची दरवाढ

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, यावर्षी ४ मे २०२०३ रोजी २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही ६१,६४६ रुपये इतकी होती. हा यावर्षीचा सर्वोच्च भाव होता. दरम्यान, २८ नोव्हेंबर, आणि १ डिसेंबर रोजी नवीन रेकॉर्ड तयार झालेत.  २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६२,७२८ रुपये झाला असून, आता हे रेकॉर्डदेखील इतिहासजमा होण्याचे चित्र दिसत आहेत. आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Silver Rate) ही ६३,२८१ रुपयांवर पोहचली आहे. तर चांदीची किंमत ही ७६,४३० रुपये किलो अशी झालेली आहे.

Malegaon | मालेगावचे माजी आमदार शेख रशीद यांचे निधन

सोन्याची मुसंडी

ह्या आठवड्यात ४ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरांत ४४० रुपयांनी दरवाढ झाली असून, ह्या महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने हे १,०३० रुपयांनी वाढले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५९,००० रुपये तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ६४,३५० रुपये इतका आहे.

चांदीतही वाढ

चांदीमध्ये ह्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसांतच १,३०० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात २,३०० रुपयांनी चांदी महागली होती. चांदीमध्ये दरवाढीचे सत्र हे सुरुच असून, दिवाळीपूर्वीपासूनच चांदीने मोठी उसळी घेतलेली होती. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव हा ८०,५०० रुपये असा आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे आज ६३,२८१ रुपये असे आहे. तर, २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ६३,०२८ रुपये असे आहे. दरम्यान, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,९६५ रुपयांवर पोहोचले आहे. तर, १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे आज ४७,४६१ रुपये झाले आहे. तर, १४ कॅरेट सोने ३७,०१९ रुपयांवर पोहचले आहे. एक किलो चांदीचा आजचा भाव हा ७६,४३० रुपये असा आहे. (Gold Silver Rate)

Administration | तुकाराम मुंडेंच्या इतक्या बदल्या; यात नेमकी कोणाची चूक..?


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here