द पॉईंट नाऊ ब्युरो : तुमच्या मोबाईलमध्ये सोनं दडलंय. असं जर कोणीही तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही त्याला नक्कीच वेड्याच्या गणतीत धराल. कारण, मोबाईल मध्ये सोनं? असं कोणालाही सांगितलं तरी खरं वाटणार नाही. मात्र हे खरं आहे.
सोनं हा एक असा धातू आहे, जो कधीही गंजत नाही. आणि याचसाठी मोबाईलच्या सर्किटमध्ये सोन्याचा थोड्याफार प्रमाणात वापर केला जातो. मोबाईलसाठी त्याचं सर्किट हाच त्याचा आत्मा आहे. आणि आत्माच गंजला, तर मोबाईल कसा चालणार नाही का! आणि याच कारणास्तव मोबाईल सर्किट बनवतांना सोन्याचा वापर केला जातो. मात्र हे सोनं म्हणजे काही खूप प्रमाणात नाही. फारफार तर 50 ते 100 रुपयांचं. आधीच सांगितलेलं बरं. नाहीतर तुम्ही मोबाईल खोलून बघायचात नाही का! असो, गंमत म्हणून हा भाग.
मात्र मोबाईल मध्ये सोनं असतं, हा करण्यात आलेला दावा अतिशय खरा ठरला आहे. यामुळे उपस्थित करण्यात आलेल्या शंकांना पूर्ण विराम मिळाला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम