सोने चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ ; जाणून घ्या आजचा दर

0
17

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंची किंमत आणि रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमध्ये सुधारणा होत असतानाच १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची दर आज रुपये ४७,७५० आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या सर्व मौल्यवान धातूची किंमत ४७,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद करण्यात आली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटप्रमाणे चांदी ६२,१५० रुपये प्रति किलोनुसार विक्री केली जात आहे. उत्पादन शुल्क, मेकिंग शुल्क आणि राज्य कर यांमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतात बदलत असतात.

काय आहे आजचा भाव?

गुड रिटर्न्स वेबसाईटप्रमाणे मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन प्रति १० ग्रॅम ४७,७५० रुपये अशी किंमत आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,०९० प्रति १० ग्रॅम अशी आहे. पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८५० असणार आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२.१९० रुपये असणारा आहे. नागपूरात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,८५० तर २४ कॅरेट सोन्याचा किंमत ५२,१९० रुपये इतकी असेल. तर नाशिकात २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८५० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ५२,१९० रुपये आहे. चांदीची किंमत प्रती १० ग्रॅमचा दर ६२१ रुपये आहे.

(वरील सोन्याच्या किंमती सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश करण्यात आलेला नाही. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here