Gmail वर भरमसाठ ईमेल भरलेत ? तर आपोआप होतील डिलिट, करा प्रोसेस

0
12

द पॉईंट नाऊ : बऱ्याच ठिकाणी आपण जीमेल ने लॉग इन केल्यामुळे भरमसाठ ईमेल येऊन पडतात. आपला इनबॉक्स फूल होतो. अनावश्यक इमेल मुळे स्पेस भरते. अशा वेळी ईमेल डिलिट करायचे म्हणल्यावर भरपूर वेळ खर्चीक होतो. तर आता या वेळेची बचत होणार आहे. व अनावश्यक ईमेल आपोआप डिलिट होणार आहेत. डिलिट करायचे असतील तर फक्त तुम्हाला ही प्रोसेस करावी लागेल. ती कोणती? पाहूया सविस्तर..

यासाठी २ पर्याय आहेत –

१) अतिरिक्त स्पेस खरेदी करता येऊ शकतो. यासाठी फक्त १५० रुपये खर्च येईल.

२) अनावश्यक मेल एक एक करून डिलिट करा. पण यामध्ये बऱ्याच वेळ वाया जातो, त्यामुळे ऑटोमॅटिक डिलिट कसे करता येतील ते पाहणार आहोत.

ऑटोमॅटिक डिलिट करण्यासाठी प्रोसेस –

वापरकर्त्यांना एक जीमेल द्वारे फिलटर्स उपलब्ध करून दिलेले आहे. फिल्टर्स फॉर ऑटो डिलिशन हे अनावश्यक ईमेल ला आपोआप डिलिट करत. याचा वापर नक्की कसा करायचा पाहूया…

१) सर्वात आधी लॅपटॉप, कॉम्प्युटर वर जीमेल ओपन करा.

२) पुढे सर्च बार ऑप्शन वर जा, तिथे उजव्या बाजूला साईज फिल्टर ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा.

३) पुढे बॉक्स ओपन होईल. यावर तुम्हाला ज्या सर्विस मेल डिलिट करायचे आहेत त्याचे फिल्टर्स बनवावे लागतील.

४) येथे तुम्हाला आरकाईव्हसह बरेच मॅसेज डिलिट करण्यासाठी ऑप्शन मिळेल. यानुसार तुम्ही पर्याय निवडा व “create filter” पर्यायावर जावा. व “delete it” हा ऑप्शन निवडा व डिलिट करा.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here