राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : नाशिक जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडून अवैध धंदे मुक्त नाशिक जिल्हा यासाठी सुचनाद्वारे पंधरा दिवसांचा अल्टीमेंटम देण्यात आला आणि काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील जनतेसाठी पोलीस प्रशासन तत्पर असून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना पत्राद्वारे यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्या. यात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी छुप्या पद्धतीने चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्याकरिता पंधरा दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आहे.
ग्रामीण भागातील नागरिक अवैध धंद्यांची तक्रार थेट माझ्याकडेही करू शकतात यासाठी लवकरच स्वतंत्र अशी एक हेल्पलाईन देखील पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून जाहीर करण्यात येणार असल्याचेही उमाप यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी आपल्या अधिकाऱ्यांसमवेत घोटी ग्रामीण कार्यक्षेत्रात प्रभावी व पारदर्शक पोलिसिंग सत्र चालू केले असून अवैध धंदे मुक्त नाशिक करण्यासाठी जसा नवनियुक्त ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी चंग बांधला आहे तसाच काहीसा निश्चय घोटी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी देखील केल्याचे दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसांत स्वतः ए पी आय दिलीप खेडकर यांनी आपल्या पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू धंद्यांवर छापा टाकत अवैध धंदे व्यवसायिकांना पुरता लगाम लावला आहे.
बुधवार ता.१६ दरम्यान पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास इगतपुरीच्या पूर्व भागातील बोरीचीवाडी येथे जंगलात असलेल्या ठिकाणी स्वतः दिलीप खेडकर यांनी भल्या पहाटे छापा टाकत घटनास्थळी असलेले गावठी दारूची हात भट्टी व गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन उध्वस्त केले आहे.यात अवैध रित्या गावठी हातभट्टी चालविणारे आरोपी शिवराम चंदर मेंगाळ, भाऊसाहेब काळू मेंगाळ राहणार बोरीचीवाडी यांना घटनास्थळी ताब्यात घेतले आहे. दरम्यान ग्रामीण भागात कर्तव्यदक्ष राहून कडक कारवाई करत पारदर्शक काम करणारे दबंग अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांची सर्वत्र ओळख आहे अशीच काहीशी ओळख आज खेडकर यांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या कडक करवाईतुन दिसून आली आहे.
या कडक कारवाईने ग्रामीण भागातील अवैध रित्या चालणारे दारूचे गुत्ते, हातभट्टी,धंदे व्यवसायिकांना चांगलाच चाप दिला आहे.
यासोबतच इगतपुरीच्या पूर्व भागातील टाकेद परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी बुधवार ता.२३ आठवडे बाजारात स्वतः आपल्या पदाधिकारी कर्मचार्यांसमवेत अवैध धंदे चालत असलेल्या अवैध व्यवसायिकांच्या ठिकाणी छापे टाकले व कडक कारवाई करत अवैध व्यवसायिकांना पुरता लगाम लावल्याचे चित्र दिसून आले या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बी पी राऊत, शिवाजी जुंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल केशव बसते, संदीप दुमळे, योगेश यंदे, गायकवाड आदी उपस्थित होते.
“अवैध धंदे मुक्त घोटी पोलीस स्टेशन करण्यासाठी ,गुन्हेगारीचा बिमोड करत पारदर्शक व प्रभावी कामकाजावर भर देत भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी घोटी पोलीस स्टेशन कायम प्रयत्नशील असून घोटी पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी छुपे पध्दतीने चालणारे अवैध धंदे,दारूचे गुत्ते ,हात भट्टी थेट उध्वस्त करण्यासाठी ही पोलिसिंग चालू आहे.अवैध धंदे व्यवसायिक सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल”
– दिलीप खेडकर , सहाय्यक पोलीस निरीक्षक घोटी पोलीस स्टेशन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम