Gatari Amavasya 2023 : मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून हिंदुत्व टांगणीवर ठेऊन फुकट कोंबडी वाटप..

0
44

Gatari Amavasya 2023 : श्रावण महिना सुरू होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरलेला आहे. त्यामुळं अनेकजण मनसोक्तपणे नॉनव्हेजवर ताव मारत आहे. त्यातच आता गटारी अमावस्येनिमित्त भाजपकडून मुंबईत मोफत कोंबडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

Mumbai : मुंबईत पोटाच्या विकारांची शिरजोरी,काय आहेत करणे?

भाजपने जारी केलेला पोस्टर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रविवारी म्हणजेच आज संध्याकाळी मुंबईतील प्रभादेवी नाक्यावर भाजपकडून नागरिकांना मोफत कोंबड्यांचं वाटप केलं जाणार आहे. आयोजकांनी कोंबड्या वाटप कार्यक्रमाच्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला आहे.

मुंबई भाजपचे पदाधिकारी बबन तोडणकर आणि चेतन देवळेकर यांच्याकडून कोंबडी वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं कोंबड्या घेण्यासाठी कार्यक्रमात मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Jharkhand : टिकली प्रकरण की जातीयवाद? झारखंडच्या त्या विद्यार्थीनीच्या आत्महत्येचं खर कारण काय?

भाजपच्या कोकण विकास आघाडीकडून आज संध्याकाळी कोंबडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झालं असून लोकांना कोंबड्या घेण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दिप अमावस्या गटारी निमित्त कोंबडी वाटप असं कॅप्शन या कार्यक्रमाला देण्यात आलं आहे.

त्यामुळं आज संध्याकाळी मुंबईकरांची लागण्याची शक्यता आहे भाजपच्या मोठ्या नेत्यांची फोटो पोस्टरवर लावण्यात आली असून भाजपच्याच कार्यालयात कोंबड्यांचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती आहे. कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

भाजपकडून शनिवारी सायंकाळी 6 वाजता कोंबडी वाटपचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. मुंबईतील प्रभादेवी नाका (सर्कल) येथे मोफत कोंबड्या वाटप केल्या जाणार असल्याची माहिती पोस्टरमधून देण्यात आली आहे. त्यामुळं आता गटारी अमावस्येची तयारी करत असलेल्यांना मोफत कोंबडी मिळणार आहे. प्रभादेवी नाक्यावर संध्याकाळी कोंबड्या घेण्यासाठी नागरिकांकडून मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यानुसार भाजप कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here