द पॉईंट नाऊ ब्युरो : गॅस सिलिंडर कंपन्यांनी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा सामान्यांना मोठा झटका देणारी आहे. नवीन घरगुती गॅस कनेक्शन साठी आता 750 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.
आधीच महागाईने त्रस्त सामान्य नागरिक. त्यात त्याला खाद्यतेल, पेट्रोल – डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या दरांनी त्रस्त केले. आणि आता तर थेट 750 रुपयांनी वाढ करण्यात आल्याने, सामान्यांना हा एक मोठा झटका आहे. आधी नवीन गॅस कनेक्शन साठी 1450 रुपये द्यावे लागायचे. मात्र आता त्यात तब्बल 750 रुपयांनी मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ही घोषणा करून सामान्यांना मोठा झटका दिला आहे.
याचबरोबर दोन गॅस सिलिंडर साठी 4400 रुपये सिक्युरिटीसाठी आता मोजावे लागतील. तर 150 रुपयांना भेटणारे रेग्युलेटर आता 250 रुपयांना भेटणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांद्वारे करण्यात आलेली ही मोठी वाढ आहे. जी सामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. उद्या अर्थात 16 जूनपासून ही वाढ लागू होणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम