चांदवड येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरात अंगारकी चतुर्थी निमित्त हजारो भाविक नतमस्तक

0
31

चांदवड; येथील आज इच्छापूर्ती गणेश मंदिरात पहाटे भाविकांच्या वतीने ट्रस्ट कडून अभिषेक पूजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्य मंदिराचे पुजारी अमोल दीक्षित यांनी केले श्रींच्या मूर्तीस नवीन वस्त्र परिधान करण्यात आले चांदीचे आभूषणे घालण्यात आले. यावेळी गाभारा विविध फुलांनी सजविण्यात आला विशेष पूजन म्हणून यावेळी केवडा महोत्सव करण्यात आला.

केवड्याच्या पानांची विशेष आरास करण्यात आली इच्छापूर्ती गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली होती भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी मंदिर ट्रस्ट व चांदवड पोलिसांच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला येणाऱ्या भाविकांना नरेन्द्र पाटील व सहकारी नांदगाव यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी सात व रात्री चंद्रोदयाच्या महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिहर गोखले,सिद्धेश शर्मा, चिमणराव बागुल, पुंडलिक सोनजे, जितेंद्र डाके ,मयूर बिरारी, निवृत्ती काटे, काकासाहेब जाधव, रोहिदास गोधडे, अंकुश शिंदे, समाधान शिंदे, संदीप माळी, भावडू गोधडे आदींनी परिश्रम घेतले पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनखाली घोलप, स्वप्नील गोसावी, प्रशांत साळवे, दिपक जाधव, माधव गांगुर्डे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here