इंधनाचे दर मोठ्या प्रमाणावर गडगडले; भारतात पेट्रोल-डिझेल दर अजून कमी होणार?

0
80

द पॉईंट नाऊ ब्युरो : इंधन दरांसंदर्भात महत्वाची बातमी आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑइल 2.34 टक्क्याने घसरून 112.55 डॉलर आणि ब्रेंट क्रूड ऑइल 2.15 टक्क्याने घसरून 113.66 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे.

सध्या इंधनदराच्या किमतींनी उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे इंधनाचे दर शंभरी पार करून गगनाला भिडले आहेत. भारतात केंद्र सरकारने कर कमी केल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आता जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर कमी झाल्याने देशात देखील इंधनाचे दर कमी होण्याची अपेक्षा केली जात आहे. मात्र भारतात काल इंधनाचे दर स्थिर होते.

महागाईच्या भडक्याने सामान्य जनता त्रस्त आहे. इंधन, गॅस अशा प्रत्येक गोष्टीत भाववाढीने चिंता वाढवली आहे. जागतिक बाजारपेठेत इंधनाचे दर वाढल्याने भारतात देखील इंधन दर वाढले. मात्र आता जागतिक बाजारपेठेत दर कमी झाल्याने भारतात अजून कमी होतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here