तुमच्या खिशाला लागणार कात्री; एक तारखेपासून बदलणार ‘हे’ महत्वाचे नियम

0
9

नवी दिल्ली : एक जून पासून काही नियम बदलणार आहेत. हे नियम बँकिंग आणि इतर आर्थिक गोष्टींशी निगडीत असल्याने त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. जाणून घ्या जून महिन्यात तुमच्या खिशावर कोणता परिणाम होणार आहे.

थर्ड पार्टी विमा होणार महाग

एक जून 2022 पासून थर्ड पार्टी विमा होणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला अधिक प्रीमियम भरावा लागणार आहे. हा नवा नियम चार चाकीच नव्हे तर दुचाकींनाही लागू होणार आहे. केंद्र सरकारने थर्ड पार्टी मोटर व्हेइकल इन्शुरन्सच्या प्रीमियम दरवाढीला मंजुरी दिली आहे.

इंजिनच्या क्षमतेनुसार प्रीमियम

मोटार विम्याच्या प्रीमियममध्ये यापूर्वी 2019-20 या वर्षासाठी वाढ करण्यात आली होती. नव्या नियमानुसार आता 1000 सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या वाहनांना थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी 2,094 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. याआधी हा प्रीमियम 2019-20 मध्ये 2072 रुपये इतका होता. तर, 1000 सीसी ते 1500 सीसी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 3221 रुपयांवरून 3416 रुपये करण्यात आला आहे. 1500 सीसी पेक्षा जास्त वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियममध्ये 7890 रुपयांवरून 7897 रुपयांपर्यंत किरकोळ वाढ करण्यात आली आहे. सरकारने दुचाकींच्या थर्ड पार्टी विमा प्रीमियमच्या दरातही बदल केला आहे. अधिसूचनेनुसार, 1 जून 2022 पासून, 150 cc ते 350 cc पर्यंतच्या बाईकसाठी 1,366 रुपये आकारले जातील. तर 350 cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकींसाठी विमा प्रीमियम 2,804 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

गोल्ड हॉलमार्किंग

गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा 2022 मध्ये 1 जून 2022 पासून सुरू होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 20, 23 आणि 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसह आणखी 32 जिल्ह्यांचा समावेश होणार आहे. गोल्ड हॉलमार्किंगच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात नोडल एजन्सी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (BIS) 23 जून 2021 पासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केली होती.

गृह कर्ज व्याज दारात वाढ

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून होम लोन घेणार असाल किंवा घेतले असेल तर तुमचा खर्च आणखी वाढणार आहे. एसबीआयने गृह कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिग रेट (EBLR) 40 बेसिस पॉईंटने वाढवला आहे. हा रेट आता 7.05 टक्के इतका झाला आहे. तर, आरएलएलआर 6.65 टक्के प्लस सीआरपी असणार आहे. नवीन दर एक जून 2022 पासून लागू होणार आहे.

आधार पेमेंटसाठी शुल्क लागू

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने (IPPB) दिलेल्या माहितीनुसार, आधार सक्षम पेमेंट सिस्टमसाठी जारीकर्ता शुल्क (AEPS) लागू करण्यात आले आहे. 15 जून 2022 पासून हे शुल्क लागू होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारतीय पोस्टची उपकंपनी आहे, जी पोस्टल विभागाद्वारे नियंत्रित केली जाते. प्रत्येक महिन्याचे पहिले तीन एईपीएस व्यवहार विनामूल्य असतील, ज्यात एईपीएस रोख पैसे काढणे, एईपीएस रोख ठेव आणि एईपीएस मिनी स्टेटमेंट समाविष्ट आहे. मोफत व्यवहारांनंतर प्रत्येक रोख पैसे काढण्यासाठी किंवा रोख जमा करण्यासाठी 20 रुपये अधिक जिएसटी, तर मिनी स्टेटमेंट व्यवहारासाठी 5 रुपये अधिक जिएसटी लागेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here