द पॉईंट नाऊ ब्युरो : बीड जिल्ह्याच्या केज-अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात झाल्याने, चौघांना आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका इनोव्हा कारने रिक्षाला दिलेल्या जोरदार धडकेत हा भीषण अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या वडिलांचे क्रियाकर्म आटोपून रिक्षाने जात असलेल्यांवर काळाने भयंकर घाला घातला. क्रियाकर्म आटोपून रिक्षाने अंबाजोगाईकडे जात असताना, भरधाव वेगात असलेल्या इनोव्हा कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी आहेत.
केज येथील भवानीमाळ वस्तीवर राहणारे हे नागरिक आहेत. ते क्रियाकर्म विधी आटोपून परत येत होते. मात्र गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास चंदन सावरगाव ते होळ शिवारादरम्यान भरधाव वेगात आलेल्या इनोव्हाने रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा पूर्णतः चक्का चुर झाला, तर इनोव्हा कारचा पुढचा भाग चक्का चुर झाला आहे. यात रिक्षात असलेले केज येथील मच्छीन्द्रसिंह ग्यानसिंह गोकी, प्रिया दिपकसिंह गोकी, विरसिंह दिपकसिंह गोकी व पिसेगाव येथील रिक्षाचालक बालाजी मुंढे यांचा जागीच मृत्यू झाला. तर जालना येथील हरजितसिंह बादलसिंह टाक, चंदाबाई बादलसिंह टाक, मालासिंह दुर्गासिंह टाक व केज येथील भवानीनगर मधील दिपकसिंह मच्छीन्द्रसिंह गोकी, गोविंदसिंह मच्छीन्द्रसिंह गोकी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम