धक्कादायक! ब्लड बँकेतून दिलेल्या रक्तातून चौघा मुलांना HIV ची लागण; एकाचा मृत्यू

0
18

द पॉईंट नाऊ ब्युरो : ब्लड बँकेतून दिलेल्या रक्तातुन चौघा मुलांना HIV झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात एकाच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

कोणत्याही संकटजन्य परिस्थितीत ब्लड बँक ही नेहमीच उपयुक्त ठरत असते. लागेल त्या वेळी रुग्णांना ब्लड बँकेतून रक्त उपलब्ध करून दिले जाते. मात्र नेहमीच रुग्णांसाठी तारणहार ठरणारी ब्लड बँक नागपूर मध्ये चौघा मुलांसाठी धक्का देणारी ठरली. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ब्लड बँकेतून दिलेल्या रक्तातून HIV ची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर येथील ही चारही मुले थेलेसेमिया या गंभीर आजाराने ग्रस्त होती असे सांगितले जात आहे. मात्र ब्लड बँकेत असा भोंगळ कारभार झालाच कसा असा प्रश्न निर्माण होत आहे.

ब्लड बँकांद्वारे रक्त संकलित करत असताना, रक्तदात्याची पूर्ण तपासणी करूनच रक्त घेतले जाते. मात्र नागपूरमध्ये घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे. या घडलेल्या प्रकाराबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here