द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात ठिकठिकाणी मान्सूनने दस्तक दिली आहे. मात्र या दस्तकदरम्यान वीज पडून बऱ्याच जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मान्सूनने महाराष्ट्रात बरसण्यास सुरुवात केली आहे. मात्र यादरम्यान बहुतांश ठिकाणी अंगावर वीज पडून जनावरांचा अन माणसांचा देखील मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात आत्तापर्यंत औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यात दोघांचा तर जालना जिल्ह्यात तिघांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. तर दोन मुले जखमी झालेली आहेत.
पावसाळा सुरू झाल्यावर अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र प्रत्येक पावसाळ्यात कोणाचा ना कोणाचा वीज पडून बळी जातोच.
वीज अंगावर पडू नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?
– लोखंडी दांडी असलेल्या छत्री वापरू नये.
– एकाच ठिकाणी एकाहून अधिक जणांनी न थांबता सुरक्षित अंतर ठेवावे.
– विजा चमकत असतांना, मोबाईलचा वापर करूच नये.
– ट्रॅक्टर, मोटारसायकल सारख्या उघड्या वाहनांवरील प्रवास शक्यतो टाळावाच.
– टेलिफोन अथवा विजेच्या खांबाखाली थांबू नये.
– दारं-खिडक्या बंद करून ठेवाव्यात.
– टेकडी, पर्वत यासारख्या उंच जागी आश्रय घेणे टाळा.
– विजा चमकत असतांना झाडांखाली थांबू नका.
– विजा चमकत असतांना शक्यतोवर घराबाहेर पडणे टाळाच.
अशा प्रकारे आपण काळजी घ्यायला हवी.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम