द पॉईंट नाऊ ब्युरो : महिलांवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही आहेत. आता तर थेट एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यात घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्याच्या मिरज येथे हा प्रकार समोर आला आहे. सौरभ खोत आणि त्याची आई अनिता खोत हे वारंवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पाठलाग करून, तिला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत होते. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हे सामान्य नागरिकांच्या संरक्षणसाठी असतात. आणि ते नेहमी तत्पर राहून आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र आता या घटनेत थेट पोलिसच त्रासाला बळी पडला आहे. या प्रकारे अयोग्य प्रवृत्तींची मजल थेट पोलीस कर्मचाऱ्यांनाच त्रास देण्यापावेतो गेल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे.
याआधी नुकतेच एका महिला उपजिल्हाधिकाऱ्याचा विनयभंग करून तिच्यावर हल्ला केल्याची आणि एका महिला नायब तहासिलदारावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. आणि आता पुन्हा महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम