Farmer Suicide : आदर्श घोटाळ्यात २२ लाख बुडाले, शेतकऱ्याची आत्महत्या..

0
58

Farmer Suicide : मराठवाड्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पतसंस्थेत घोटाळा झाल्याने शेतकरी, कामगार आणि नोकरदारांना पैसे बुडण्याची भीती आहे.

Gatari Amavasya 2023 : मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून हिंदुत्व टांगणीवर ठेऊन फुकट कोंबडी वाटप..

मात्र आता आदर्श घोटाळ्यात पहिला बळी गेला आहे. पैसे बुडण्याच्या भीतीने औरंगाबाद तालुक्यातील लाडगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रामेश्वर नारायण इथर असं मृत शेतकऱ्याचं नाव असून त्यांचे तब्बल २२ लाख रुपये आदर्श सहकारी पतसंस्थेत होते. मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी गोळा केलेले पैसे बुडण्याच्या चिंतेत रामेश्वर यांनी आत्महत्या केल्याचं तपासात समोर आल आहे.

औरंगाबाद येथील आदर्श सहकारी पतसंस्थेत नियमबाह्य पद्धतीने कर्जवाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी पतसंस्थेत तब्बल २०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून त्यात मराठवाड्यातील असंख्य शेतकरी आणि नोकरदारांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे. उपनिबंधक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात आदर्श पतसंस्थेत २०० कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. रामेश्वर यांनी आदर्श पतसंस्थेत २२ लाख रुपये जमा केले होते. मुलीचं शिक्षण आणि त्यानंतर तिच्या लग्नासाठी जमा केलेले पैसे बुडण्याची भीती रामेश्वर यांना होती.घोटाळा झाल्याच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केली आहे. रामेश्वर यांचे वडील, आई आणि मुलीच्या नावावर ही रक्कम जमा करण्यात आली होती.

Ajit pawar ; अजित पवारांची ठाणे-नाशिक ट्रेन वारी

आदर्श सहकारी पतसंस्थेत २०० कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात औरंगाबाद शहरातील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी आदर्श सहकारी पतसंस्थेचे मुख्य संचालक अंबादास आबाजी मानकापे यांच्यासह अन्य मंडळ आणि कर्जदारांवर स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here