परतीच्या पावसामुळे बळीराजा पुन्हा संकटात; खरीप पिकांचे नुकसान

0
20

द पॉईंट नाऊ: तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर लासलगावसह निफाड तालुक्यातील अनेक गावांत परतीच्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. त्यामुळे कांद्यासह सोयाबीनसह अन्य खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आता खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. या परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्याला भाव नसल्याने साठवलेला कांदाही खराब होऊ लागला आहे.

निफाड तालुक्यातील लासलगावसह विंचूर, नेताले खडकमाळेगाव, कोटमगाव, टाकळी तसेच खेडलेझुंगे, सारोटी, रुवं देवगाव, कानळद उगाव, वरसगाव, नांदुर्डीसह अनेक गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. या परतीच्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.विशेषत: कांदा पिकाची जास्त प्रमाणात नासाडी झाली आहे. त्यामुळे शेतकन्यांची चिंता अधिकच वाढली आहे.

परतीच्या पावसामुळे शेतकन्यांची तयार झालेली पिके पावसाच्या पाण्यात वाहून गेली. मुख्य पीक असलेल्या कांद्याचे शंभर टके नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तसेच मका, बाजरी, सोयाबीन या इतर पिकांनाही फटका बसला आहे. एकीकडे शेतकन्यांना कांद्याला योग्य भाव भाव मिळत नाही तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक पाण्याखाली गेले आहे. कांद्याचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना कधी बाजारभाव मिळत नाही तर कधी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा सामना करावा लागतो. शासनाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होत आहे.

आधीच अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, तसेच बियाणे खते यांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी त्रस्त आहे आणि त्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here