शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण शेतीचा मार्ग जोपासावा

0
20
फोटो ओळ ; देवळा येथील दिनेश देवरे यांच्या पेरूच्या बागेची पाहणीकरतांना कृषी उप संचालक कैलास शिरसाठ समवेत शेतकरी दिनेश देवरे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा: फळबाग शेती करताना आधुनिक तंत्रज्ञान व प्रयोगशीलता जोपासण्याची गरज आहे. त्यासाठी खास करून युवा शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण फळशेतीला भेट देत सर्व बाबी जाणून घ्याव्यात आणि शेतीला नवा आयाम द्यावा असे मार्गदर्शन कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी केले. बागलाण तालुक्यात आयोजित जिल्हा मासिक शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. कसमादे परिसर विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी दिनकर देवरे यांच्या शेतात जाऊन पेरूची पाहणी करून त्यांनी समाधान व्यक्त केले.

फोटो ओळ देवळा येथील दिनेश देवरे यांच्या पेरूच्या बागेची पाहणीकरतांना कृषी उप संचालक कैलास शिरसाठ समवेत शेतकरी दिनेश देवरे आदी छाया सोमनाथ जगताप

यावेळी कार्यालयातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा विस्तार केंद्राचे डॉ बबनराव हिले, कृषी विज्ञान केंद्र वडेल येथील रुपेश खेडकर व जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला हायटेक नर्सरी, मशीनच्या सहाय्याने नर्सरीमध्ये बियाण्याची मशीन द्वारे बियाणे टोकण, पेरणी यंत्राच्या साहाय्याने कांद्याची लागवड, पेरूच्या विविध व्हरायटी द्वारे केलेली लागवड (तैवान पिंक, रेड डायमंड), गोल्डन सुपर जातीचे सीताफळाची लागवड, एमआरजीएस योजनेमधून डाळिंबाची लागवड, क्रॉप कव्हर तंत्रज्ञान वापरून पूर्व हंगामी द्राक्षाचे उत्पादन, कृषी विभागाच्या योजनेमधून कांदाचाळ, ड्रॅगन फ्रुट लागवड , रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेटी व देशी गिर गाईचे संवर्धन प्रकल्प व डेरी इत्यादी ठिकाणी उपस्थित अधिकारी व शास्त्रज्ञानी भेटी देऊन शेतकऱ्याने वापरलेले तंत्रज्ञान व अधिक उत्पादनाची माहिती घेण्यात आली. तसेच कृषी विभाग व कृषी विद्यापीठ यांची व शेतकऱ्यांमध्ये समर्पक चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमाचे काही फोटोग्राफ्स शेअर करण्यात येत आहेत, यावेळी बागलांणचे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी मार्गदर्शन केले, याप्रसंगी लोहनेणेर ग्रामपंचायतीचे सदस्य सतीश देशमुख, कसमादे परिसर विकास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी व प्रगतीचे शेतकरी दिनकर देवरे, ठेंगोडा येथील प्रगतिशील शेतकरी नितीन आहेर , अभिजीत येवला ,आबा बर्दे, राजेंद्र बागुल, सचिन सोनवणे आदींसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here