मा.आमदार जनुभाऊ आहेर यांचे निधन; वयाच्या 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
49

देवळा : देवळा तालुक्यासाठी आजची रात्र दुःखद ठरली आहे. कारण तालुक्याच्या विकासातील धुरंधर नेतृत्व मा. आ. जनुभाऊ आहेर हे काळाच्या पडद्याआड गेले असून त्यांची प्राणज्योत मावळली आहे. यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तत्कालीन चांदवड-कळवण मतदारसंघांचे (1972/1978) आमदार म्हणून जनार्दन (जनूभाऊ ) केदू आहेर यांनी आपले उल्लेखनीय काम करत शहराचा आवाज विधिमंडळात लावून धरला. त्यांच्या कार्यकाळात अत्यंत महत्वाचे निर्णय घेत सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासत त्यांनी कारकीर्द गाजवली.

या धुरंधर नेत्याने वयाच्या 102 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. वृद्धपकाळाने काळाने त्यांचे निधन झाले असून, चांदवड देवळा मतदारसंघाचे ते 1972 ते 78 या काळात त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी ते अपक्ष निवडून आले होते. देवळा तालुक्यातील विविध संस्थांवर त्यांनी काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांच्या 101 व्या वाढदिवसानिमित्त शरद पवार यांनी त्यांची नाशिक येथे भेट घेतली होती.

जनुभाऊ यांच्या पश्चात एक मुलगा, पाच मुली, सुन, नातवंडे असा परिवार असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता विजय आहेर यांचे ते वडील तर माजी नगसेवक उमेश आहेर यांचे आजोबा आहेत.

अंत्यविधी बुधवार दिनांक 21 रोजी सकाळी 11:30 वाजता देवळा अमरधाम येथे करण्यात येणार आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here