Jalgaon : एरंडोलमधील धार्मिक स्थळावर प्रवेशबंदीचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी काढले आहे. त्यानंतर आता हे प्रकरण हायकोर्टात पोहचलं आहे.
Water Supply Shortage : शहरावर पाणीकपातीच संकट, महापालिका मोठ्या निर्णयाच्या तयारीत
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातल्या एका धार्मिक स्थळात प्रवेशबंदी करण्याचा निर्णय जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी घेतला आहे.
एरंडोलमधील एका मशिदीच्या बांधकामावर हिंदू संघटनांनी आक्षेप घेत त्या जागेवर दावा ठोकला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्याने दोन्ही गटांसोबत बैठक घेत वादग्रस्त मशीद परिसरात प्रवेशबंदी लागू केली आहे.
त्यानंतर आता जुम्मा मशीद ट्रस्ट समितीने जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या १८ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणीत होणार आहे.
Nashik Viral Video: नाशिकमध्ये दोन गटांत हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल शहरातल्या एका मशिदीचं बांधकाम अतिक्रमण करून करण्यात आलं असून मशीदीची रचना मंदिरासारखी असल्याचा दावा करत पांडववाडा संघर्ष समिती या हिंदू संघटनेने मशीदीवरच दावा ठोकला आहे. त्यानंतर प्रकरण आणखी चिघळू नये, म्हणून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एरंडोलमधील मशीद परिसरात नागरिकांना जाण्यास बंदी घातली होती. तसेच दोन्ही गटातील नागरिकांना चर्चेसाठी बोलावलं होतं. परंतु त्यापूर्वीच जिल्हाधिकारी मित्तल यांनी ११ जुलै रोजी मशीद परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. अंतिम आदेश पारित होईपर्यंत प्रार्थनास्थळाचं पावित्र्य राखले जाईल, याची खात्री करण्यासाठी दररोज दोन व्यक्तींना तेथे प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरोधात जुम्मा मस्जिद ट्रस्टने १३ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्यायालयाने सलग दोन दिवस सुनावणी घेतली असून त्यानंतर आता येत्या १८ जुलै रोजी पुन्हा सुनावणी होणार असल्याची माहिती जुम्मा मस्जिद ट्रस्ट समितीचे वकील एसएस काझी यांनी दिली आहे. मशीद परिसरात पांडवांचा अधिवास होता,परिणामी तेथील जागेवरचं अतिक्रमण हटवून मंदिरासाठी ती जागा देण्यात यावी, अशा मागणीचा अर्ज पांडववाडा संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम