नवी दिल्ली – बँक ऑफ बडोदाने आज कर्जाचा व्याजदर ०.१५ टक्क्यांनी महाग केले आहे, तर बँक ऑफ महाराष्ट्राने व्याजदरात ०.३५ टक्क्यांनी कपात केली आहे. नवीन व्याजदर हे ११ जुलैपासून लागू झाले आहेत.
बँक ऑफ बडोदाने सांगितले की, ३ व ६ महिन्यांसाठी MCLR चा दर ७.३५ ते ७.४५ टक्के असेल तर एक वर्षाचा दर ७.५० ते ७.६५ टक्के असेल. नवीन आणि जुन्या ग्राहकांसाठी १२ जुलैपासून नवीन दर लागू होणार आहेत. दुसरीकडे, युनियन बँकेनेही MCLR ०.१० टक्क्यांनी वाढवून ६.८० टक्के केला आहे. म्हणजे युनियन बँकेचा एका महिन्याच्या व्याजदर हा ६.९० टक्के असेल. हे दरही सोमवारपासून लागू झाले आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्राने सांगितले की, एक वर्षाचा MCLR ७.७० वरून ७.५० टक्के कमी केला जाईल तर तीन महिन्यांचा MCLR ०.३५ टक्क्यांनी कमी करून ७.२० टक्के केला जाईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम