देवळा १३ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान

0
53

देवळा : ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या दहिवड, फुलेनगर, वासोळ, वाजगाव, मटाने, भूऊर, खामखेडा, विठेवाडी, डोंगरगाव, श्रीरामपूर, चिंचवे, कनकापूर, सटवाईवाडी या गावातील ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदासह पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केला आहे .

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करणे – २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर ,छाननी -५ डिसेंबर ,माघार व चिन्ह वाटप -७ डिसेंबर , मतदान -१२ डिसेंबर व मतमोजणी २० डिसेंबर रोजी घेण्यात येईल . अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली .

वरील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणूकिचा कार्यक्रम घोषित झाल्यानें इच्छुक उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून, त्यांनी वार्ड निहाय मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे . यामुळे राजकीय धुराळा उडाला आहे . खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल .

थेट सरपंचपदांसह 7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान

राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here