देवळा : उद्या मंगळवारी (२०) रोजी तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीच्या मतमोजणीसाठी 13 टेबल लागणार असून सकाळी 10 वाजता देवळा तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे .यासाठी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
प्रत्येक ग्रामपंचायात निहाय प्रभाग क्रमांक एक पासून मतदान केंद्रनिहाय मतमोजणीची फेरी सुरू होईल . यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. रविवारी दि (१८ ) रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सर्वच उमेदवारांनी विजयाचा दावा केला आहे. उद्या होणाऱ्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असल्याने उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. आज दिवसभर उमेदवार व समर्थकांनी आकडेमोड करून आपला विजय निश्चितअसल्याचा निष्कर्ष काढला आहे. मात्र खरे चित्र उद्या होणाऱ्या मतमोजणी नंतर स्पष्ट होणार आहे .
ग्रामपंचायत निकालावर आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुका राजकीय पक्षांसाठी महत्त्वाच्या ठरणार असल्याने याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे .
जिल्ह्यात १४ तालुक्यांमध्ये होणार मतमोजणी
इगतपुरी ०२, कळवण १६, चांदवड ३५ , त्र्यंबक ०१, दिंडोरी ०६, देवळा १३, नांदगाव १५, नाशिक १४, निफाड २०, पेठ १, बागलाण ४१, मालेगाव १३, येवला ०७, सिन्नर १२
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम