देवळा ;(सोमनाथ जगताप) तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ४० प्रभागांसाठी ४० मतदान केंद्रासाठी येत्या ( दि ४) ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे.यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून,एकूण २५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याकामी आज शनिवारी(३०) रोजी कर्मच्याऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतदानासाठी एकूण पुरूष मतदार १०७५३, महिला मतदार ११८०७ असे एकूण २२५६० मतदार आहेत. ग्रामपंचायत निवडणूकसाठी ५० मतदान पथक स्थापन करण्यात आले असून ,५० मतदान केंद्राध्यक्ष, १५० मतदान अधिकारी, ५० शिपाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक पथकासोबत एक पोलीस कर्मचारी नेमण्यात येणार आहे.
या सर्वांना आज( दि ३० ) रोजी सकाळी ११ ते २ वा या कालावधीत तहसिल कार्यालयात तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विजय बनसोडे हे प्रशिक्षण देणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान यंत्राचा EVM वापर होणार असून याचे देखील प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे.
मतदान पथकातील कर्मचाऱ्यांना ( दि ३) ऑगस्ट रोजी मतदान साहित्य वाटप करण्यात येऊन पथक मतदान केंद्रावर रवाना होतील.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम