
देवळा प्रतिनिधी : स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी टी डी एफ प्रगती पॅनल ला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन मा.आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी एन डी एस टी सोसायटीच्या टी डी एफ गटाच्या प्रगती पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी बोलताना व्यक्त केले. एन डी एस टी सोसायटीच्या टी डी एफ गटाच्या प्रगती पणलचा प्रचाराचा शुभारंभ ठेंगोडा येथील सिद्धीविनायक गणेश मंदिरात पॅनलच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत नारळ फोडून करण्यात आला.

यावेळी देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविध्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या अध्यक्षतेखाली प्रचारसभा संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर आ नानासाहेब बोरस्ते, यशवंत तात्या पाटील ,शिवाजी निरगुडे, गंगा मामा शिरसाठ, डॉ भास्कर सावंत, बाळासाहेब सूर्यवंशी, मधुदादा भदाणे, सी पी कुशारे, के के गांगुर्डे, शेलार सर, गोरख सोनवणे, भास्कर भगरे, दिलीप आहेर, भारती पवार, किशोर जाधव, बी बी निकम, संजय देवरे, बी के रौंदळ , अरुणा खैरनार ,शिक्षक सेनेचे संजय खैरनार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बी एस सूर्यवंशी यांनी नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अँड नॉन टीचिंग को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक जिल्हा टीडीएफ , शिक्षक सेना, माध्यमिक शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, शिक्षकेतर संघ, आश्रम शाळा संघटना व समविचारी संघटना प्रणीत प्रगती पॅनल निर्माण केला असुन या माधमातून स्वछ प्रतिमेचे उमेदवार दिले असुन या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन यावेळी बाळासाहेब सूर्यवंशी यांनी केले.
एकसंघपणे लढा दिल्यास आपल्या पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी सभेचे अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी व्यक्त केला. शिक्षक नेते व उमेदवार मोहन चकोर यांनी पॅनल ची भूमिका स्पष्ट करूनआपल्या सर्व उमेदवारांचा याठिकाणी परिचय करून दिला. संजय पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
टीडीएफ प्रगती पॅनल कडून इच्छुक असणारे नाशिक मतदारसंघातील भाऊसाहेब शिरसाठ व संजय चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज पाच वर्षे सेवा पूर्ण नसल्याने बाद करण्यात आला होता. परंतु संस्थेची निवडणूक नियम नियमावली ही मंजूर नसल्याने त्याविरुद्ध उच्च न्यायालयात खटला प्रलंबित आहे. यावेळी निंबा कापडणीस, सचिन पगार, चंद्रशेखर सावंत, संजय वाघ, मंगेश सूर्यवंशी, दत्तात्रय आदिक, समीर जाधव, गंगाधर पवार, अरुण पवार, ज्ञानेश्वर ठाकरे, संजय टी पाटील, शांताराम देवरे, विलास जाधव, दीपक ह्याळीस, बाळासाहेब ढोबळे, संजय देसले, अनिल देवरे, अशोक बागुल, मोहन चकोर, भारती पाटील, विजया पाटील आदि उमेदवार उपस्थित होते.
यावेळी टीडीएफ-प्रगती पॅनल प्रचार समिती मंडळातील नानासाहेब बोरस्ते,शिवाजीराव निरगुडे,बाळासाहेब सूर्यवंशी ,गोरख तात्या सोनवणे, मधुकर भदाणे, सुरेश शेलार, नानासाहेब देवरे, रवींद्र मोरे, रवींद्र जोशी, ई के कांगणे, सुभाष टिळे, टी एम डोंगरे,अण्णासाहेब काटे,सी पी कुशारे, रामराव बनकर,राजेंद्र सावंत,आर आर मवाळ, गोविंद भदाणे, मनोज शिरसाठ, ए जी देवरे,भास्करराव भगरे, संजय देवरे, आर के बच्छाव, संजय वाघ, भारती पवार यांच्यासह बागलाण, देवळा , कळवण तालुक्यातील शाळांचे शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डी वाय भदाने यांनी सूत्रसंचालन केले. मनोज शिरसाठ यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम