जळगाव : गिरीश महाजन यांचे विश्वासू सहकारी अरविंद देशमुख यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून भाजपाचे तीनही उमेदवार निवडून येतील जर कोणाला शंका असेल तर त्यांनी एक लाख रुपयांची पैंज लावावे असे थेट आव्हान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. देशमुख हे गिरीश महाजन यांचे अतिशय विश्वासू मानले जातात नेमके त्यांच्या पोस्ट मागे काय समीकरण आहे, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राज्यसभा निवडणूक रंगतदार झाली आहे, यात शिवसेनेची प्रतिष्ठान पणाला लागली असून भाजपाने देखील आपली संपूर्ण ताकद निवडणुकीत लावली आहे. ही निवडणूक जिंकणे भाजपसाठी तसेच सेनेसाठी देखील महत्वाचे आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या भरोशावर सेनेने मैदानात उमेदवार दिलेला आहे मात्र देशमुख यांनी संशयाचे जाळे निर्माण केले आहे.
गिरीश महाजन हे फोडाफोडीच्या राजकारणात माहीर मानले जातात यामुळे त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी अशा पोस्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत तर काहींनी सोशल मीडियाद्वारे खिल्ली उडवली आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम