मुंबई: ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष राज्यात पेटला असताना हे नेते आमने सामने आल्यावर काय होणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. शिवसेना फुटल्यानंतर नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे हे समोरा समोर येतील असे वाटत होते मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलंच नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत सहभागी झाले मात्र त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्याठिकाणी उपस्थित नव्हते. यामुळे या नेत्यांचा संघम महाराष्ट्रला बघायला मिळाला नाही, हे तीनही नेते एकाच मंचावर येणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे याला निमित्त आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचं. त्यामुळे हे तिन्ही नेते एकत्र येणार का ? आले तर काय बोलणार ? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या अनावरण विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात करण्यात येणार आहे या समारंभास बाळासाहेबांच्या जवळचे असलेले सिनेअभिनेते अमिताभ बच्चन, पार्श्वगायिका आशा भोसले यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. येत्या 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून त्यानिमित्ताने हा तैलचित्र अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात येणार आहे. आता उद्धव ठाकरे हे निमंत्रण स्वीकारणार का वाद टाळण्यासाठी निमंत्रण टाळणार याकडे लक्ष लागून आहे, उद्धव ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारलं तर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते एकाच मंचावर येतील यामुळे शाब्दिक टोलेबाजी बघायला मिळणार आहे.
त्यावेळी या तिन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार ? ते एकमेकांशी संवाद साधतील का? त्यांची बॉडी लँग्वेज काय असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्याशिवाय या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारून शिंदेसोबत आलेला दुरावा दूर करण्यासाठी उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे टाकणार का? याचंही उत्तर मिळणार आहे.
तसेच निमंत्रण नाही स्वीकारलं तर शिंदेंसोबतची उद्धव ठाकरे यांची कटुता दूर झाली नसल्याचंही अधोरेखित होणार आहे, असं सांगितलं जातं. त्यामुळेच 23 जानेवारी हा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान, शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही अशा परिस्थितीत नेते एकत्र आल्यास काय होणार याकडे लक्ष लागून आहे, दोन्ही गटाकडून रोज एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांच्या जवळ येण्याऐवजी अधिकच दूर गेलेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे-शिंदे यांच्या एकाच कार्यक्रमातील भेटीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम