मुंबई: आज राज्य भरात दहीहंडी उत्सव सुरू असून यंदा राजकीय रंग मोठ्या प्रमाणात या उत्सवाला आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आज विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी भेट देत संवाद साधला यावेळी त्यांनी शिवसेनेला चांगलेच चिमटे काढले आहेत. शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना शिवसैनिक मुख्यमंत्री म्हणून बघायचा होता, तसेच धर्मवीर आनंद दिघे यांना ठाण्यातील शिवसैनिक उच्च पदावर असावा हे स्वप्न होत आणि ते आज साकार झाले असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमावेळी केले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी सांगितले की मी व माझ्या समर्थकांनी “खूप मोठी दहीहंडी फोडली” असे म्हणत शिवसेनेला, उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ३० जून रोजी भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे शिंदे आणि शिवसेनेच्या पन्नास आमदारांसह त्यांनी टेंभी नाका येथे दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी ते बोलत होते.
“तुम्ही आता दहीहंडी फोडत आहात. आम्ही दीड महिन्यापूर्वी खूप मोठी व कठीण दहीहंडी फोडली होती. ती खूप अवघड, उंच होती आणि आम्हाला 50 भक्कम थर लावावे लागले पण आम्ही यशस्वी झालो,” असे शिंदे म्हणाले.
शिवसेना प्रमुख बाळासाेब ठाकरे यांना शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा होती, तर दिवंगत आनंद दिघे यांना ठाण्यातील सेनेच्या कार्यकर्त्याला सर्वोच्च पद मिळावे अशी इच्छा होती अन् ती आता पूर्ण झाली असे शिंदे म्हणाले. 1990 च्या दशकात ठाण्यातील शिवसेनेचा प्रमुख चेहरा असलेले दिघे हे शिंदे यांचे गुरू मानले जातात. दिघे यांची इच्छा आता पूर्ण झाली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जनसमुदायाशी बोलताना सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम